शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही गटातील व्यक्तींना उपलब्धतेनुसार मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ७ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. ...

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ७ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी व कौठा या ७ केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस याठिकाणी ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. याव्यतिरिक्त कोव्हॅक्सिन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, हैदरबाग, शिवाजीनगर, कौठा, जंगमवाडी, दशमेश, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको या ११ केंद्रांवर कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटांसाठी देण्यात येईल. या केंद्रांवर प्रत्येकी १५० डोस उपलब्ध आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १६ केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करुन दिले आहेत. हे डोस प्राधान्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दिले जातील.

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, उमरी या ८ केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले असून हे डोस दोन्ही वयोगटांतील व्यक्तींसाठी आहेत. ग्रामीण रुग्णालय नायगाव केंद्रावर कोव्हॅक्सिनचे ३० डोस उपलब्ध असून हे सुद्धा दोन्ही वयोगटांतील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असून ही लस ४५ वर्षांवरील वयोगटांतील व्यक्तींसाठी प्राधान्याने दिली जाईल.

जिल्ह्यात ३ जूनपर्यंत एकूण ४ लाख ३८ हजार ६७० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले तर ४ जूनपर्यंत कोविड-१९ लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे ४ लाख २७ हजार ३३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख २५ हजार ७०० डोस याप्रमाणे एकूण ५ लाख ५३ हजार ३० डोस प्राप्त झाले आहेत. कोविशिल्डचे डोस ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत तर कोव्हॅक्सिनचे डोस हे १८ ते ४४ वयोगट व ४५ वर्षांवरील (दुसरा डोस) वयोगटांसाठी उपलब्ध आहे.