शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मानवी जीवनात सज्जनांच्या सहवासाला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

मालेगाव : मानवी जीवनात सज्जनांच्या सहवासाचे महत्त्व खूप आहे. सज्जनांचा सहवास प्राप्त झाला की, मानवाच्या जीवनाचे सोने होऊन ...

मालेगाव : मानवी जीवनात सज्जनांच्या सहवासाचे महत्त्व खूप आहे. सज्जनांचा सहवास प्राप्त झाला की, मानवाच्या जीवनाचे सोने होऊन मनातील षडविकारही नाहीसे होतात. मानवाला सज्जनांची संगत सहवास मिळाला तर उत्तम कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन शिवकीर्तनकार प्रा. धाराशिव शिराळे यांनी मालेगाव येथे अपरंपार स्वामी भक्त मंडळच्या वतीने अंखड शिवनाम सप्ताहात केले.

हे सप्ताहाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. पुढे बोलताना शिराळे म्हणाले की, संस्कारांमुळे आपण घडतो आपल्यातील षडविकार नष्ट होतात व आपले कल्याण होते ते केवळ संतांच्या सहवासाने मानवी जीवनात संकटे आली तर त्या संकटांवर आपण धैर्याने मात करू शकतो, ते धैर्य सज्जन व्यक्ती आपणास त्यांच्या ज्ञानदानातून देत असतात. सज्जनांचा सहवास आपणास घडावयाचा असेल तर अंत:करणातून परमेश्वराची प्रार्थना करणे अपेक्षित आहे, असे ते प्रवचनात म्हणाले. परमेश्वराची प्रार्थना करणे म्हणजे कर्मकांड नाही तर अंतकरणातून नामस्मरण करणे होय. नामस्मरणाने जीवनातील संकटे नष्ट पावतात, तसेच सुंदर विचारांचे बीजारोपण आपल्या मनात होत असते इतरांविषयीचा क्रोध मावळतो व सर्वाभूती समभाव आपल्यामध्ये निर्माण होतो तेव्हा सज्जनांचा सहवास व परमेश्वराचे नामस्मरण आपण जर केले तर या दुःखरूपी जीवनातून आपण तरून जाऊन सुख, ज्ञान, धन व उत्तम आरोग्य प्राप्त होते, असे ते म्हणाले.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य स्वामी, गुरुवर्य१०८ करबसव शिवाचार्य स्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने मालेगाव, ता. अर्धापूर येथे परमरहस्य पारायण सोहळा तसेच कीर्तन, प्रवचन, भजन आदी समारंभाचे आयोजन मागील २४ वर्षांपासून केले जात आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार गायक-वादक आपली सेवा देत आहेत. कोरोना काळातील सर्व नियम पाळून पारायण सोहळा संपन्न होत आहे. सकाळी रुद्राभिषेक, शिवपाठ, नंतर परमरहस्य पारायण, भजन रात्री शिवकीर्तन या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.