शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

माहूर झाले विद्रूप माहूर - शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डींग, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी झाली असून यामुळे विद्रुपीकरण ...

माहूर झाले विद्रूप

माहूर - शहरात ठिकठिकाणी अवैध होर्डींग, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी झाली असून यामुळे विद्रुपीकरण जोरात सुरू आहे. नियमानुसार नगर पंचायतीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असताना तसे होत नाही. नगर पंचायतही संबंधितांविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे.

पद रद्द करा

उमरी - वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा अवमान करणारे सेनेचे आ.प्रताप सरनाईक यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी छावाच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे योगेश पाटील, मराठा मावळा संघटनेचे कैलास पाटील, प्रकाश शिनगरवाड, हणमंत पाटील, राम जाधव, श्रीनिवास शिंदे, प्रतीक जाधव, कैलास पाटील आदी उपस्थित होते.

आकोसकर यांना पदोन्नती

मुखेड - येथील पोलीस निरीक्षक नरसिंग आकोसकर यांना पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यांची नियुक्ती जात पडताळणी समितीच्या उपाध्यक्षपदी झाली. मार्च २०१९ पासून आकोसकर मुखेड येथे कार्यरत आहेत.

सरचिटणीसपदी मोरे

नायगाव - हजेरी सहाय्यक कर्मचारी संघटनेच्या प्रांत चिटणीसपदी तुकाराम मोरे यांची निवड झाली. २६ डिसेंबर रोजी पाटोदा (बीड) येथे झालेल्या संघटनेच्या सभेत ही निवड करण्यात आली. याच कार्यक्रमात संघटनेचे एस.वाय. कुलकर्णी यांच्या पत्नीला गौरविण्यात आले.

२५ उमेदवारी अर्ज

मुखेड - तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून आतापर्यंत २५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बेटमोगरा ७, बाऱ्हाळी ११, सांगवी बे.६, बेरळी खु. १ असे एकूण २५ अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक कामात तहसीलदार काशीनाथ पाटील, नायब तहसीलदार एस.एस. मामीलवाड, प्रशांत लिंबेकर आदी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

बावनकुळे यांचे स्वागत

अर्धापूर - माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे नांदेडकडे जात असताना त्यांचे मालेगाव येथे जंगी स्वागत करण्यात आले. भाजयुमोच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विराज देशमुख, कृष्णा इंगोले, कुलदीप घोडेकर, विलास साबळे, योगेश हाळदे, अंगद मंगनाळे, संजय कळणे, तुळशीराम बंडाळे आदी उपस्थित होते.

तरुणाची आत्महत्या

बिलोली - तालुक्यातील हिप्परगाथडी शिवारात २५ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २७ डिसेंबर रोजी उशिरा उघडकीस आली. सदर युवक लोहगाव येथील रहिवासी आहे. गजानन उर्फ शंकर चांदू उमरे (वय२५) असे मयताचे नाव आहे. १५ ते २० दिवसापूर्वी जन्मलेल्या तान्हुल्या मुलीला व पत्नीला भेटण्यासाठी काही दिवसापूर्वी तो सासुरवाडीला गेला होता. अशातच त्याने २७ रोजी हिप्परगाथडी येथे आत्महत्या केली. त्याला दोन मुली आहेत.