शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

कोंबून प्रवासी भरलेल्या वाहनाकडे पोलिसांचे दुर्लक्ष माहूर : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यावर अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असून ...

कोंबून प्रवासी भरलेल्या वाहनाकडे पोलिसांचे दुर्लक्ष

माहूर : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यावर अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असून त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे .पोलीस प्रशासन आणि नियमबाह्य खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे सबंध इतके मधुर आहेत की जणूकाही वाहतूक पोलिसांकडुन खाजगी वाहतूकदारांना कोणताही धोका होऊ शकणार नाही असे चित्र दिसून येत आहे.

माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळ कडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतुकदारांना होत आहे. बसची अपुरी संख्या प्रवाशाच्या सोयीनुसार बसची सेवा नसणे आणि तीन - चार तास एकही बस नसणे तर दिवसभरातून केवळ एकदाच बस असणे असे प्रकार ग्रामीण भागात असल्याने प्रवासी वैतागून खाजगी वाहतुकीकडे वळतात बसस्थानक परिसररात खाजगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा असतो. दलाल बसस्थानकातून प्रवासी पळवतात प्रवाश्यांच्या दृष्टीने सोयीची वाटणारी खाजगी प्रवासी वाहतूक धोकादायकही आहे.माहूर तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला असून प्रवासी कोंबून भरलेले असतात. एक एका रिक्षामध्ये दहा पेक्षा अधिक तर टॅक्सी किंवा ऑटोरिक्षात पंधरा ते वीस जण बसलेले असतात. वाहनांची तपासणी होणार असल्याने चालकांना आधीच कळलेले असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित पणे तपासणी मोहीम सुरू केल्यास माहूर तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतुकीला आला बसू शकेल.

कुपटी ते इवळेश्वर मार्गे माहूर, वानोळा ते राजगड, दिगडी (धा.) ते वानोळा मार्गे माहूर, वानोळा ते फुलसावंगी, वाई बा.ते माहूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी असून प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसवून ही वाहतूक केली जाते अनेकदा प्रवासी थेट टॅक्सीला मागे लटकून किंवा टपावर बसवून वाहतूक होताना दिसते. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे यदाकदाचित अपघात झाला तर सबंधिताकडून कार्यवाहीचे नाटक होते त्यानंतर जैसे थे चे चित्र पहावयास मिळते.

माहूर तालुक्यातील ग्रामीन भागात होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालून सबंधित वाहन चालकांवर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.