शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची पोत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

सिंगारवाडी येथे चोरी भोकर - तालुक्यातील सिंगारवाडी येथे १ लाख ७८ हजार रुपयांची धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी विनोद माने ...

सिंगारवाडी येथे चोरी

भोकर - तालुक्यातील सिंगारवाडी येथे १ लाख ७८ हजार रुपयांची धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी विनोद माने यांचे घरफोडले. माने हे कुटुंबियासमवेत शेतात गेले असता चोरट्यांनी याचा फायदा उचलला. घरातील ७८हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख १ लाख असा ऐवज लंपास केला. भोकर ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

हिमायतनगरातून ट्रॅक्टर लंपास

हिमायतनगर - शहरातील प्रताप गल्लीतून चोरट्यांनी ट्रॅक्टर लांबविल्याची घटना उघडकीस आली. संजय शिंदे यांनी सदरचे ट्रॅक्टर रामराव मादसवार यांच्या शेतामध्ये सागवानाच्या बागेजवळ उभे केले होते. चोरट्यांनी प्रथम ट्रॅक्टरची बॅटरी व त्यातील डिझेल काढले. नंतर ट्रॅक्टर चालू करून ते लांबविले. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात येताच हिमायतनगर पोलिसात फिर्याद नोंदवण्यात आली. जमादार बालाजी लक्षटवार तपास करीत आहेत.

मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

कंधार - शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मोटारसायकल पाहताच कुत्रे पाठलाग करतात. त्यामुळे वाहनावरील चालकाचा ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता आहे. ही मोकाट कुत्रे झुंडीच्या झुंडीने रस्त्यावर फिरत असतात. गल्लीबोळामध्येही कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

सिमेंटचा ट्रक फसला

हिमायतनगर - माहूर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाळकी फाटा पुलाजवळील वळण रस्त्यात सिमेंट घेवून जाणारा ट्रक फसला. या घटनेत चालक, क्लीनर सुखरूप असले तरी एक प्रवासी गंभीर जखमी झाला. पुढील उपचारासाठी त्याला नांदेडला हलविण्यात आले आहे. यापूर्वी अर्धवट पुलामध्ये पडून पांगरी येथील शेतकऱ्याचा तर उमरी येथील एका शिवसेैनिकाचा खड्डयात पडून बळी गेला होता. महामार्गाचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी होत असूनही याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही.

संगीत विद्यालयाचे १ रोजी उद्घाट

नांदेड - नादब्रह्म संगीत विद्यालयाचे उद्घाटन संत नामदेव संकुल चिखलवाडी येथे १ जानेवारी रोजी सकाळी १० वा.खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला भा.ग.देशपांडे, रमाकांत जोशी, वसंतराव वाळकीकर, रमेश रेणगुंठवार, सुभाष बाऱ्हाळे, ॲड.जोंधळे आदींची उपस्थिती राहणार असल्याचे विद्यालयाचे संस्थापक अंबादास कानोले यांनी सांगितले.

हरबळ ग्रामपंचायत बिनविरोध

कंधार - कंधार तालुक्यातील हरबळ ग्रामपंचायत २७ डिसेंबर रोजी बिनविरोध निवडून आली. सरपंचपदी यमुनाबाई टाले, उपसरपंचपदी शिवलीला वाघमारे यांची निवड झाली. गावातील संजय सोनकांबळे, जयराम टाले, बालाजी टाले यांनी याकामी परिश्रम घेतले.

भोसीकर यांचा सत्कार

लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या अध्यक्षपदी तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी हरीहरराव भोसीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी जीवन पाटील घोगरे, उत्तमराव पाटील, प्रांजली रावणगावकर, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.