ऑटोला अपघात, तरुणाचा मृत्यू
करखेली ते धानोरा रस्त्यावर भरधाव वेगाने जात असलेला ऑटो उलटल्याने त्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी घडली. ऑटो क्रमांक एमएच-२६, एसी-०५७६ या ऑटोत बसून साईनाथ संभाजी मुकेवाड हा तरुण करखेली ते धानोरा जात होता. यावेळी ऑटोचालक भगवान शंकर देवके, रा. बोळसा, ता. उमरी याने भरधाव वेगाने ऑटो चालविला; परंतु नियंत्रण सुटल्याने तो उलटला. या अपघातात साईनाथ मुकेवाड याचा मृत्यू झाला. या प्रकरणात माधव मुकेवाड यांच्या तक्रारीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रार दिल्याच्या कारणावरून मारहाण
नांदेड : पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २५ एप्रिल रोजी हदगाव तालुक्यातील पांगरा येथे घडली.
प्रेमराव आनंदराव करनुरे हे घरी असताना आरोपी त्याठिकाणी आले. आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देतो का, असे म्हणून त्यांनी प्रेमराव यांच्याशी वाद घातला. त्यानंतर लाकडाने त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात शंकर तुकाराम भूतनर, भागाेराव भूतनर, ज्योती भूतनर, आशा भूतनर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.