शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य नसतानाही मिळवली नोकरी, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत शिरसाठ यांनी १८ सप्टेंबर १९९२ रोजी स्वातंत्र्य सैनिक रामा दुधवाड यांचे रक्ताचे नातेवाईक म्हणजेच भाचा ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत शिरसाठ यांनी १८ सप्टेंबर १९९२ रोजी स्वातंत्र्य सैनिक रामा दुधवाड यांचे रक्ताचे नातेवाईक म्हणजेच भाचा असल्याचे बनावट कागदपत्र तयार केले. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी २६ वर्षापासून सेवाही बजावली आहे. या प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रारंभी हे प्रकरण चौकशीवरच ठेवण्यात आले. मात्र सदर प्रकरणात शासन आदेशानुसार स्वातंत्र्य सैनिकाच्या जवळच्या एका नातेवाईकास सवलतीचा फायदा घेता येतो. परंतु ते स्वातंत्र्य सैनिकाचे रक्ताचे नातेवाईक असल्यास शासन नियमाप्रमाणे लाभ मिळवण्यास पात्र ठरतात. मात्र हनमंत शिरसाठ हे दुधवाड यांच्या जातीचेही नसल्याचे पुढे आले आहे. स्वातंत्र्य सैनिक रामा दुधवाड हे कोळी महादेव या जातीचे आहेत. तर शिरसाठ हे मराठा जातीचे असल्याने शासकीय सेवेतील अभिलेखानुसार तो खुल्या प्रवर्गात येतो. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक दुधवाड यांच्याशी शिरसाठ यांचे कोणतेही रक्ताचे संबंध नसताना त्यांनी खोटे कागदपत्र सादर करुन ते खरे असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकीर शेख सगीर यांनी केली. या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६५, ४०६, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.