शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

साने गुरुजी जयंती बिलोली - तालुक्यातील अर्जापूर येथे जयराम अंबेकर विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सुभाष ...

साने गुरुजी जयंती

बिलोली - तालुक्यातील अर्जापूर येथे जयराम अंबेकर विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सुभाष देगलूरकर, सतीश जोशी, विजय गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी साने गुरुजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन पवार यांनी केले. यावेळी कडलवार, ढगे, भालके, मुंगडे, गंगा पापूलवार, बाबू शेख आदी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

लोहा - ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने लोहा तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षण तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिले. प्रशिक्षणासाठी नायब तहसीलदार देवराय, अशोक मोकले, तिरुपती मुंगरे, अव्व्ल कारकून बडवणे, संगणक तज्ज्ञ गिरी, प्रशांत अपशेटे, सूर्यकांत पांचाळ आदींनी परिश्रम घेतले.

प्रशासन मतदार केंद्रावर

हदगाव - तालुक्यासह बरडशेवाळा, पळसा, मनाठा परिसरात ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तलाठी, झोनल ऑफीसर यांच्याकडून शाळा, अंगणवाडी, मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी औषध सुविधा आहेत का याची माहिती घेतली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

रासेयोच्या वतीने स्वच्छता

अर्धापूर - शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २५ डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रवीण देशमुख, व्यंकटी राऊत, तानाजी मेटकर, गोरखनाथ राऊत, शरद पतंगे आदी उपस्थित होते.

गव्हाचे पीक बहरले

लोहा - लोहा तालुक्यात गहू, हरभरा या पिकांना सध्या पोषक वातावरण निर्माण झाले. बेन्नाळ परिसरात गव्हाचे पीक चांगलेच बहरल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. सध्या मुबलक पाणी व पोषक वातावरण असल्याने गव्हाला ज्वर आला आहे.

वाळुची खुलेआम तस्करी

कंधार - तालुक्यात ठिकठिकाणी वाळूची तस्करी सुरू आहे. नूतन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.वाळू तस्करीमुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे.अप्रत्यक्षरित्या महसूल प्रशासनाचे वाळू तस्करीला पाठिंबा आहे की काय अशी चर्चा सुरू आहे.

शंभवी गबाळे हिची निवड

मुखेड - शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयातील शंभवी बालाप्रसाद गबाळे हिची राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेसाठी निवड झाली. सौर उर्जेवर ठीबक सिंचन या प्रयोगाचे ती प्रदर्शन करणार आहे. शंभवी ही१०वीत शिकणारी आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ.मनोहर तोटरे, पी.एम. कोयले, ए.सी.जाधव आदींनी तिचे स्वागत केले.

दत्त मूर्ती प्रतिष्ठापणा

धर्मबाद - तालुक्यातील मौजे पाटोदा (थडी) येथे दत्त मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाला जि.प.सदस्य पूनम पवार, बाजार समितीचे संचालक रमेश गौड, सतीश मोटकुल यांची उपस्थिती होती. रत्नाळी येथेही द्रौपदी माता मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला.