शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या कार्याची ऊर्जा सज्जनांच्या संगतीत मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

मालेगाव: मानवी जीवनात सज्जनांच्या सहवासाचे महत्त्व खूप आहे. सज्जनांचा सहवास प्राप्त झाला की, मानवाच्या जीवनाचे सोने होऊन मनातील ...

मालेगाव: मानवी जीवनात सज्जनांच्या सहवासाचे महत्त्व खूप आहे. सज्जनांचा सहवास प्राप्त झाला की, मानवाच्या जीवनाचे सोने होऊन मनातील षडविकारही नाहीसे होतात. मानवाला सज्जनांची संगत सहवास मिळाला तर उत्तम कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होते असे प्रतिपादन शिवकीर्तनकार प्रा.धाराशिव शिराळे यांनी मालेगाव येथे अपरंपार स्वामी भक्त मंडळच्या वतीने अंखड शिवनाम सप्ताहात केले.

हे सप्ताहाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. पुढे बोलतांना शिराळे म्हणाले की, संस्कारांमुळे आपण घडतो आपल्यातील षडविकार नष्ट होतात व आपले कल्याण होते ते केवळ संतांच्या सहवासाने मानवी जीवनात संकटे आली तर त्या संकटांवर आपण धैर्याने मात करू शकतो, ते धैर्य सज्जन व्यक्ती आपणास त्यांच्या ज्ञानदानातून देत असतात. सज्जनांचा सहवास आपणास घडावयाचा असेल तर अंतकरणातून परमेश्वराची प्रार्थना करणे अपेक्षित आहे असे ते प्रवचनात म्हणाले. परमेश्वराची प्रार्थना करणे म्हणजे कर्मकांड नाही तर अंतकरणातून नामस्मरण करणे होय. नामस्मरणाने जीवनातील संकटे नष्ट पावतात तसेच सुंदर विचारांचे बीजारोपण आपल्या मनात होत असते इतरांविषयीचा क्रोध मावळतो व सर्वाभूती समभाव आपल्यामध्ये निर्माण होतो तेव्हा सज्जनांचा सहवास व परमेश्वराचे नामस्मरण आपण जर केले तर या दुःखरुपी जीवनातून आपण तरुन जाऊन सुख ज्ञान धन व उत्तम आरोग्य प्राप्त होते असे ते म्हणाले.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य स्वामी, गुरुवर्य१०८ ‌ करबसव शिवाचार्य स्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने मालेगाव ता. अर्धापूर येथे परमरहस्य पारायण सोहळा तसेच कीर्तन, प्रवचन, भजन आदी समारंभाचे आयोजन मागील २४ वर्षांपासून केले जात आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार गायक-वादक आपली सेवा देत आहेत. कोरोना काळातील सर्व नियम पाळून पारायण सोहळा संपन्न होत आहे. सकाळी रुद्राभिषेक, शिवपाठ, नंतर परमरहस्य पारायण, भजन रात्री शिवकीर्तन या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.