शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवसाअखेर ४३ पैकी ११ ग्रामपंचायतींसाठी ४६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अर्धापूर : अर्धापूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या ३७७ जागांसाठी दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अर्धापूर : अर्धापूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या ३७७ जागांसाठी दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास बुधवार, २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिला व दुसरा दिवस निरंक गेला असला तरी सोमवारी तिसऱ्या दिवशी ११ ग्रामपंचायतींमधून ४६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठी तहसील कार्यालयातील इच्छुकांसह समर्थकांची एकच गर्दी झाली होती.

दिनांक ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ऑफलाईन कागदपत्र जमा केले जाणार आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने तयारी केली आहे. यासाठी पंचवीस ते तीस कक्ष तयार करण्यात आले असून, शंभर ते दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १२ निवडणूक निर्णय अधिकारी, १२ सहाय्यक निवडणूक अधिकारी आदींची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची ३१ डिसेंबरला छाननी होणार आहे. दरम्यान, ४ जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत.

३७७ सदस्यांसाठी ४६ अर्ज दाखल

सोमवारी ११ ग्रामपंचायतींसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये मेंढला बु.- ८, शहापूर-अमरापूर-हमरापूर ६, गणपूर ४, कामठा बु. २, सांगवी खु./ खडकी ५, दाभड १, शेलगाव बु. ९, शेलगाव खु. २, शेणी २, देळुब खु. ५, निमगाव २ असे एकूण ४६ अर्ज दाखल झाले आहेत.