शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे जातप्रमाणपत्राची किंमत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

अनुसूचित जाती जमाती चार हजार :,ओबीसी आठ-दहा हजार हदगाव : ग्रामपंचायत निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे जमविण्यासाठी दमछाक होत असून ...

अनुसूचित जाती जमाती चार हजार :,ओबीसी आठ-दहा हजार

हदगाव : ग्रामपंचायत निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे जमविण्यासाठी दमछाक होत असून कागदपत्राचे महत्व ओळखून महसूल विभागात प्रमाणपत्राचे भाव वाढले आहेत.

तालुक्यात १०८ ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आहेत त्यापैकी ४८ सरपंच ओबीसीचे होणार आहेत. २६ एस्सी व १३ आदिवासी त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवाराकडे जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र नाहीत ते तत्काळ प्रमाणपत्रे काढण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहेत या संधीचा फायदा महसूल विभाग उचलायला तयार आहे. गावातील सेतू केंद्रापासून नायब तहसीलदारापर्यंत हे जाळे पसरले आहे.

अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र शंभर दोनशे रुपयांत काढून देणारे चार हजार रु मागणी करीत आहेत. तर ओबीसीसाठी आठ ते दहा हजार रु मोजावे लागत आहेत.

मनाठा येथील एका उमेदवाराने संपूर्ण कागदपत्रे जुळवून जातप्रमाणपत्र संचिका तयार केली गावातील सेतू चालकास आठ हजार रु ठरले.

याच सेतू चालकाने विरोधकास ही माहिती दिली. त्याने राजकीय वजन वापरुन ते प्रमाणपत्र थांबविले. यामुळे उमेदवार भडकला सेतू चालकास जातप्रमाणपत्र दे अथवा दिलेले पैसै परत कर अशी मागणी केली सेतू चालकाने हात वर केले. मी साहेबांना पैसे दिल्याचे सांगितले आता ते कोण साहेब यांची चौकशी सुरू आहे.

ओबीसी प्रमाणपत्रासाठी योग्य कागदपत्रे दिल्यास जातप्रमाणपत्र देण्यास अडचण नाही, पण आमदारांनी फोन केल्यामुळे तहसीलदार चक्रावले आहेत गावपातळीवरील राजकारण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही.

पण काही असो कोरोनामुळे अडचणीत आलेले एकूण व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागत आहेत वरती भरवशाचा संगणक चालक भेटला तर बरा नाहीतर त्रुटीत अर्ज येण्याची धास्ती वेगळीच.