शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुक्यातील शिक्षण विभाग रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST

कंधार : तालुक्यात जि.प.च्या एकूण १८७ शाळा आहेत. शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांत योग्य समन्वय साधून एकंदरित ...

कंधार : तालुक्यात जि.प.च्या एकूण १८७ शाळा आहेत. शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांत योग्य समन्वय साधून एकंदरित तालुक्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असते; परंतु अतिरिक्त पदभार असलेले गटशिक्षणाधिकारी वैद्यकीय कारणास्तव १ डिसेंबरपासून रजेवर असल्याचे समोर आले आहे. अद्याप गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार कोणाकडेही सोपविला नसल्याने शिक्षक, कर्मचारी आदींचे वेतन लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत. तसेच विविध देयकांचे प्रस्ताव रखडले असल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे.

गत काही काळापासून तालुका गटशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे प्रभारीराजवर शिक्षणाची मदार होती. त्यामुळे लोहा येथील रवींद्र सोनटक्के यांच्याकडे कंधार ता. गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. सोनटक्के हे २९ जुलैपासून पदभार सांभाळत आहेत. कोविड काळात शाळा बंद असताना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमांतर्गत व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण व शिक्षक मित्रांच्या साहाय्याने हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणले. जि. प. शिक्षकांच्या गृहभेटी, स्वाध्याय आदींतून शिक्षणाची सोय केली.

तालुक्यात शिक्षण विभागाची १७ केंद्रे आहेत. त्यात चिखली, पानभोसी, कुरुळा, दिग्रस बु., फुलवळ, बोळका, बारूळ, आंबुलगा, उस्माननगर, मंगलसांगवी, शेकापूर, कंधार, गोणार, कौठा, शिराढोण, रुई, बहाद्दरपुरा या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांतर्गत १८७ शाळा असून, प्राथमिक शिक्षक ५८१, मु. अ. २७, प्राथमिक पदवीधर ७७, शिक्षकेतर कर्मचारी ३२, शिक्षण विस्तार अधिकारी ६ आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन बिले दाखल करणे, भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव, वैद्यकीय देयके, थकबाकी देयके आदींवर गटशिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते आणि पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रश्न निकाली निघतो; परंतु १ डिसेंबरपासून अतिरिक्त पदभार पेलणारे गटशिक्षणाधिकारी वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने आर्थिक, शिक्षण विभागाची प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. देयकासाठी शिक्षक हेलपाटे घालत आहेत. फक्त ७ केंद्रांचे वेतन बिल दाखल झाले आहे. १० केंद्रे व ५ माध्यमिक शाळांची बिले अद्याप दाखल झाली नसल्याचे समजते. त्यामुळे वेतन लांबणीवर जाण्याची भीती सातशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. तात्काळ वरिष्ठ पातळीवरून गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार कोणाकडे तरी देऊन गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.