शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षांच्या बैठकीचा अध्यक्षांनी मागितला खुलासा

By admin | Updated: November 6, 2014 13:41 IST

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी १ नोव्हेंबर रोजी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीबाबत जि. प. अध्यक्षा मंगला गुंडिले यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे खुलासा मागितला आहे.

नांदेड : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी १ नोव्हेंबर रोजी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीबाबत जि. प. अध्यक्षा मंगला गुंडिले यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड यांना खुलासा मागितला आहे. अशी बैठक घेण्याचे अधिकार उपाध्यक्षांना आहेत का व असले तर ते कोणत्या नियमाने आहेत याबाबतही त्यांनी विचारणा केली.जिल्हा परिषदेत १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपाध्यक्ष धोंडगे यांनी विभागप्रमुखांची बैठक घेवून विविध सूचना केल्या होत्या. त्यात जि. प. च्या उत्पन्नवाढीच्या प्रमुख विषयासह माळेगाव यात्रा तयारीचाही आढावा घेण्यात आला होता. या बैठकीचे रितसर पत्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंह राठोड यांच्या स्वाक्षरीने विभागप्रमुखांना दिले होते. या बैठकीस सर्व विभागप्रमुखांनी हजेरी लावून चर्चेत सहभाग नोंदवला होता. त्याचवेळी आता उपाध्यक्षांना अशी बैठक घेता येते काय अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती. याबाबत खुद्द जि. प. अध्यक्षा मंगला गुंडिले यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हे, तर ३ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांना एक पत्र देवून त्या बैठकीबाबत खुलासा मागितला आहे. त्यात अशी बैठक झाली काय, बैठकीचे पत्र आपल्या स्वाक्षरीने काढले होते. जिल्हा परिषदेतील कोणत्याही बैठकीचे पत्र हे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढावे की अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी काढावे, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य हे दोघेही असताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र काढण्याचे अधिकार कुणी प्रदान केले? आदी बाबींची विचारणा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर जि. प.च्या अध्यक्षा अनुसूचित जातीच्या असल्याने अध्यक्षांचे संपूर्ण अधिकार उपाध्यक्षांना देण्याची कायद्यात तरतूद आहे काय आणि आपण अनुसूचित जातीची महिला अध्यक्ष आहे म्हणून आपण जातीय द्वेषातून असे कृत्य केलात काय, अशी विचारणाही करण्यात आली आहे. या पत्राचा दोन दिवसांत खुलासा करावा असे अध्यक्षा गुंडिले यांनी स्पष्ट केले आहे. खुलासा न केल्यास कारवाई करण्याबाबतही इशारा दिला आहे. /(प्रतिनिधी)

■ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी मात्र या बाबीला फारसे महत्व देत नसल्याचे सांगताना येत्या आठवड्यात बीओटीसंदर्भात स्वतंत्र बैठक आपण आयोजित करणार असल्याचे सांगितले.> जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी बोओटी प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्राही जवळ आली आहे. या यात्रेच्या तयारीसाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचे ते म्हणाले.