शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राला साकडे, पीकविमापोटी ८०० कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरीपमध्ये व बहुतेक शेतकर्‍यांनी सोयाबीन, ज्वारी, ...

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरीपमध्ये व बहुतेक शेतकर्‍यांनी सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांना संरक्षण घेतले होते. परंतु खरीप २०२० मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत व काढणीपश्चात पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सामुदायिक पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांच्या वतीने केली गेली होती. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व विमा कंपनीकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कर्मचारी यामुळे ही रास्त मागणी शेतकर्‍यांनी केली होती, परंतु जिल्हा प्रशासनाने ती नाकारली व वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एक प्रकारे विमा कंपनीचे अपुरे कर्मचारी ही बाब शेतकर्‍यांच्या आर्थिक शोषणाला करणीभूत ठरली. तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला गेला नाही, त्यामुळे शेतकर्‍यांचे शोषण झाले आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये काढणीपश्चात पडलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना २५ टक्के नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. परंतु ती नाकारली गेली आहे व अशाप्रकारे दुसर्‍यांदा आर्थिक शोषण झाले आहे. पीकविम्यात शेतकरी नऊ लाखांवर सहभागी झाले आहेत व खासगी विमा कंपनीला केंद्र सरकार राज्य सरकार व लाभार्थी शेतकरी यांनी मिळून ६२५ कोटींच्या वर नांदेड जिल्ह्यातला हप्ता भरला आहे. तर नुकसानभरपाई फक्त १३४ कोटी मिळालेली आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ८०० कोटी रुपयांची न्याय नुकसानभरपाई मिळायला हवी होती, परंतु ती न देऊन शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण केले गेले आहे.