शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

राज्यातील आरोग्य विभागात आजघडीला ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही संवर्गाची भरती ...

राज्यातील आरोग्य विभागात आजघडीला ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही संवर्गाची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कोरोनासारख्या जागतिक महामारीत आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा ढासळली. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्णालय आणि कोविड सेंटरची संख्या वाढवावी लागली. मात्र, त्या तुलनेत आरोग्य कर्मचारी कमी असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सेवक यासह इतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात २० कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले होते. त्यासाठी सातशेहून अधिक जणांची नियुक्ती करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात बाहेर निघायलाही कुणी धजावत नसताना या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या आणि कुटुंबाच्या जिवाची काळजी न करता रुग्णांना जेवण देणे, औषध देणे, आंघोळ घालणे, त्यांचे बेडशीट धुणे यासह इतर कामे केली आहेत. यातील अनेकांना कोरोना झाला होता. कोरोनाची रुग्णसंख्या सप्टेंबरनंतर कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरुवात करण्यात आली होती. आजघडीला मोजकेच कर्मचारी कर्तव्यावर आहेत.

समविचारी मंचचे राज्यभर आंदोलन

आरोग्य विभागातील जवळपास साडेआठ हजार रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. कोरोना काळात जोखीम पत्करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र समविचारी मंचने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे.