शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दूध,भाजीपाल्यात घट

By admin | Updated: November 20, 2014 14:57 IST

तालुक्यातील ६00 लोकवस्तीचं गायतोंड हे गाव. मागासवर्गीय बहुतुल्य वस्ती. भूमिहीन मजूर व अल्पभूधारक सर्वत्र मिळतील.

हदगाव : तालुक्यातील ६00 लोकवस्तीचं गायतोंड हे गाव. मागासवर्गीय बहुतुल्य वस्ती. भूमिहीन मजूर व अल्पभूधारक सर्वत्र मिळतील. पाण्याची व्यवस्था जेमतेम. शेताशेतामध्ये १५ बाय २0 आकाराने खोदलेल्या विहिरी आढळतात., परंतु जनावरांना व भाजीपाला खाण्यापुरताच पाणीसाठा येथे उपलब्ध आहे. येथील बहुतांश शेतकरी भाजीपाला काढून विक्री करतात. मनाठा, बामणीफाटा, वारंगा व हदगाव येथील आठवडी बाजारात येथील मंडळी जातात. अनेकांनी थोडीफार शेती व भाजीपाला विक्रीवर मुलींचे लग्न केले. मुलांचे शिक्षणही उरकले. अशांच्या चेहर्‍यावर आता मात्र असमाधानाची भावना पसरली आहे. आता काय करावे? वर्ष कसं काढणार? वर्ष धकलं तरी पुढं काय? पुढची पेरणी. आता पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडायचं कसं, याचीच चर्चा गावात सुरू असते. 

■ अनेक शेतकरी भाजीपाला व दूध विक्रीचा पुरक व्यवसाय करतात. पाण्याअभावी भाजीपाला लागवडीत घट झाली आहे. चार्‍याअभावी दुधाळ जनावरांच्या दुधात घट होणार, हे निश्‍चित आहे. अल्पभूधारक शेतकरी अनेक सुशिक्षित बेकार युवक दुधाळ जनावरे घेवून दुग्धव्यवसाय करतात. चार्‍याअभावी त्यांनी दुधाळ जनावर विक्रीस काढली आहेत. त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करावा? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. 
■ हदगाव : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हदगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या संकटात वाढ झाली. तालुक्यातील मनाठा आणि गायतोंडचे ६0 टक्के ग्रामस्थ शेतीवर अवलंबून आहेत. निसर्गाच्या पाण्यावरच ही शेती अवलंबून आहे. संपूर्ण वर्षांचे बजेट शेतीच्या उत्पन्नावर असते. आता नापिकीने आलेखच बदलला आहे. उन्हाळ्यात घरकामाला सुरुवात केलेल्या शेतकर्‍यांच्या घरांची कामे रखडलीे आहेत. पेरणीसाठी अर्धवट राहिलेली घरे, सिझन झाल्याने बांधणारा शेतकरी घरकाम पूर्ण कसे करणार? असा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकर्‍यांच्या मुलींच्या लग्नाचे नियोजन असते. 
यंदा उत्पन्न नसल्याने मुलींचे लग्न कसे करणार? याची चिंता अनेकांना लागली. अनेक शेतकर्‍यांची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांना लागणारा शैक्षणिक खर्च कसा भागवायचा?अध्र्यावरच शिक्षण सोडून द्यावे लागेल की काय? याची भीती अनेकांना आहे./ सुनील चौरे/ हदगाव