शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

इस्लापूर येथे दत्त जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

लोकसहभागातून वृक्षारोपण हदगाव - जीवनांकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हदगाव येथील स्मशानभूमीमध्ये लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अब्दुल्ला चाऊस, ...

लोकसहभागातून वृक्षारोपण

हदगाव - जीवनांकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हदगाव येथील स्मशानभूमीमध्ये लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अब्दुल्ला चाऊस, हरीश्चंद्र चिल्लोरे, अजीत बंडेवार, शेख रसुलभाई, शेख नजीरोद्दीन उपस्थित होते.

हायमॅक्सच्या कामास सुरुवात

लोहा - शहरातील छत्रपती शिवाजी चौकमधील बंद पडलेल्या हायमॅक्सच्या कामास काही दिवसापूर्वी सुरुवात झाली. याकामी खा.प्रताप पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. यावेळी पं.स. उपसभापती नरेंद्र गायकवाड, गटनेते करीम शेख, नगरसेवक भास्कर पवार, राजू इंगळे, दत्ता वाले आदी उपस्थित होते.

जमाते इस्लामीचा मेळावा

बिलोली - येथे जमाते इस्लामीचे सदस्य समाज बांधवांचा मेळावा शुक्रवारी घेण्यात आला. सुरुवातीला जिल्हाध्यक्ष मिर्झा युसुफबेग यांनी कुरान पठण म्हटले. यावेळी सईद शीबीबी, महंमद जीयाउद्दीन, अब्दुल अ.गनी, खाजा मोईनोद्दीन, नजीर पटेल, इमाम सावलीकर, गफूर कुरेशी, मसुद शीबीबी, ॲड.रिझवान, शेख चांदभाई, शेख सलीममीया, वासे पटेल, मिर्झा अजीजबेग, वहाब सिद्दीकी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शेख मेहबुब, मिर्झा बेग, इरशाद मौलाना, शौकत बेग, नवाब खान, जीयाऊर इरफान, मुशीफ शेख आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नवाबखान पठाण यांनी म्हटले.

उपाध्यक्षपदी पाटील

बिलोली - तालुक्यातील लघूळ येथील तथा माजी सभापती शांतेश्वर पाटील यांनी भाजपा किसान मोर्चाच्या नांदेड उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, खा.प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील, जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी, लक्ष्मणराव ठक्करवाड, महिला आघाडीच्या चित्रा गोरे, बाबुराव केंद्रे आदी उपस्थित होते.

रस्त्याची दुरावस्था

मुदखेड - मुदखेड-मुगट ते आमदुरा मार्गे नांदेडला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खड्डयामुळे आमदराजवळ माजी नगराध्यक्ष शंकर राठी यांच्या भावाचा २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता अपघात झाला. त्यात ते जखमी झाले. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी होत आहे.

पळसागाव तांडा येथे स्वच्छता अभियान

उमरी - तालुक्यातील पळसगाव तांडा येथे विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. याकामी अविनाश जाधव यांनी पुढाकार घेतला. ३१ डिसेंबर रोजी अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.

दांडेगावकर यांचा सत्कार

नांदेड - राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड झाली. त्याबद्दल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दासराव पुयड यांनी वसमत येथे जावून दांडेगावकर यांचा सत्कार केला. यावेळी अभिजित मुळे पाटील, खालीद नवाज व अन्य उपस्थित होते.