शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये शेतकऱ्यांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

पार्डी : अर्धापूर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत समजली जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली आणि कोरोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि बोगस ...

पार्डी : अर्धापूर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत समजली जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली आणि कोरोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि बोगस बियाणे शिरकाव केला. यामुळे कृषी अर्थव्यवस्था पार कोलमडली त्यात भरीस भर गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले यामध्ये शेतकऱ्याचे हिरवे स्वप्न उध्वस्त झाले.

अर्धापूर तालुक्यात निसर्गप्रकोप आणि मानवनिर्मित संकटामुळे सरत्या वर्षात निसर्ग प्रकोपासह बोगस बियांनामुळे शेतकऱ्याची वाट लागली या परिस्थितीतून सावरण्यासाठी रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे याही पिकांवर परिणाम झालेला दिसत आहे. सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीन काढणीचे कामही पडले नाही. सोयाबीन पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. सोयाबीन पेरले पोत्याने आणि घरी आणले मुठीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मानवनिर्मित संकटाने हाहाकार अर्धापुर तालुक्याची अर्थव्यवस्था मोडून काढली आहे. अर्धापूर शहरातून दररोज कोटीच्या जवळपास आर्थिक व्यवहार होत असतो. मात्र कोरोनामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाली होती. तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था केळीच्या पिकावर अवलंबून आहे. येथील केळी देशासह परदेशात निर्यात केली जाते. केळीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध आहे. लाखो मजुरदार केळीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. मजुरदाराचे उपजीविकेचे साधन केळीच पीक आहे आणि अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रमुख पीक केळी आहे. मात्र केळी काढणीच्या वेळीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्याने आणि देशात लॉकडाऊन करावे लागले यामुळे संपूर्ण दळणवळण व्यवस्था ठप्प झाली. केळीची निर्यात थांबल्याने केळीला कवडीमोल दर मिळाला अनेक शेतकऱ्याची केळी बनात राहिली केळीची नासाडी झाली होती.

अनेक शहरे लॉकडाऊन झाल्याने केळीला कवडीमोल दर मिळाला होता. लाखो रुपये खर्च करून केळी उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात काही पडले नाही. केळीसाठी लाखो रुपये खर्च केला. मात्र तोही निघाला नाही यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस बरोबर तुरीच्या उत्पादनही घटले आहे. यातून उभारण्यासाठी रब्बी हंगामाची तयारी केली मात्र सततचे ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवरही परिणाम झाला आहे. रब्बीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकंदरीत २०२० वर्ष शेतकऱ्यांसाठी लाभदायक राहिला नाही.