शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस स्थापना दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार नायगाव - येथील डॉ. शेख यांच्या रुग्णालयासमोरील रस्त्यावर वेगातील दुचाकीने धडक दिल्यामुळे ८२ वर्षीय वृद्ध ...

दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

नायगाव - येथील डॉ. शेख यांच्या रुग्णालयासमोरील रस्त्यावर वेगातील दुचाकीने धडक दिल्यामुळे ८२ वर्षीय वृद्ध मरण पावल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. शेवंताबाई सुकाजी आरोटे (रा.केरूर ता.बिलोली) असे वृद्धेचे नाव आहे. एम.एच.२६-बी.आर. २६५०या क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना धडक दिली. नायगाव पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

एसबीआयकडून मार्गदर्शन

लोहा - राष्ट्रीय किसान दिनानिमित्त लोह्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या वतीने देऊळगाव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शाखा प्रबंधक नरावाड, फिल्ड ऑफिसर संजय मामीड उपस्थित होते. तसेच पोलीस पाटील गणेश राऊत, शेख मुर्तूजा, जोंधळे, सविता सातपुते यांचीही उपस्थिती होती.

सय्यद अजीज यांची नियुक्ती

नांदेड - वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक नांदेड येथे कनिष्ठ लिपिक पदी सय्यद अजीज यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली. याबद्दल त्यांचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ते पूर्वी १४ वर्ष सेवक म्हणून कार्यरत होते. सत्कार कार्यक्रमास सहाय्यक अधीक्षक सुभाष राठोड, वरिष्ठ लिपिक पपुलवार, लिपिक धोंडगे, संजय चौडेकर आदी उपस्थित होते.

माजी सैनिकांची मागणी

कंधार - येथील हुतात्मा स्मारक परिसरातील उद्यानाला हुतात्म्याचेच नाव देण्यात यावे अशी मागणी माजी सैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी गोविंदराव पाटील चिखलीकर यांचे नाव देण्याची मागणी केली जात होती. त्याला माजी सैनिकांनी विरोध केला.

यात्रा पुढे ढकलली

हिमायतनगर - सवना व जिरोना परिसरातील पाचशिव महादेव फाट्यावरील पार्श्वनाथ मंदिराची यात्रा यंदा पुढे ढकलण्यात आली. कोरोनामुळे परवानगी मिळाली नसल्याने ही यात्रा पुढे ढकलण्यात आल्याचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी सांगितले. सवना, रमनवाडी, जिराेना, गणेशवाडी, महादापूर, दगडवाडी, चिंचोर्डी, एकघरी, पार्डी, वाशी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून जानेवारी महिन्यात पहिल्या सोमवारी पार्श्वनाथ महादेवाची यात्रा भरत असते.

४० गावांना भेटी

धर्माबाद - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी ४० गावांना भेटी देऊन कायदा व सुव्यवस्थेचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले. यावेळी सपोनि अशोक उजगरे, फौजदार गणेश कऱ्हाड, अनिल सनगले आदींनीही विविध गावांना भेटी देऊन नागिरकांच्या बैठका घेतल्या व आवश्यक त्या सूचना केल्या.

काँग्रेसची बैठक

भोकर - आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचाळकर कॉम्प्लेक्समध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, शहर जिल्हा उपाध्यक्ष संदीप सोनकांबळे, मदन देशमुख, केशव पाटील, शहराध्यक्ष जाजू इनामदार, साहेबराव सोमेवाड आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांची भाषणे झाली. सूत्रसंचालन माजी नगरसेवक मनोज गिमेकर यांनी तर गोविंद मेटकर यांनी आभार मानले. बैठकीला विकास क्षीरसागर, गोविंद देशमुख, तौसिफ इनामदार, विक्रम क्षीरसागर, विठ्ठल धोंडगे, मधुकर गोवंदे, गौतम कसबे, सुनील शिवेवार, शेख अफरोज, आरेफ इनामदार आदी उपस्थित होते.