शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST

नांदेड : गतवर्षी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास १८ कंपन्यांवर ...

नांदेड : गतवर्षी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास १८ कंपन्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले हाेते. त्यामुळे यंदा सोयाबीन बियाणे खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, बियाणांची उगवणक्षमता तपासूनच बियाणांची विक्री करावी, असे आवाहन संघटनेने केले आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गतवर्षी बाजारात अनेक कंपन्यांसह व्यापाऱ्यांनी बियाणांची वाढती मागणी लक्षात घेऊन बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे काम केले. त्यातून लाखो शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नसल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यात केवळ महाबीजकडून नुकसानभरपाई म्हणून बियाणांची किमतीची रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यात आली. परंतु इतर कंपन्यांनी हात वर करत न्यायालयात विवाद करणे सोयीचे मानले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. परिणामी यंदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड‌्स सीड‌्स डिलर्स असोसिएशनच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना पत्र पाठवून आवाहन केले आहे. सर्व व्यापाऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासूनच बियाणांची विक्री करावी, असे पत्रात नमूद केले आहे.

विक्रेत्यांनी ही घ्यावी काळजी

सोयाबीन बियाणांच्या प्रत्येक लॉटमधील बियाणांमधून १०० ते १५० बिया घेऊन उगवणक्षमतेची विहित पद्धतीने पडताळणी करावी. तसेच ज्या लॉटमध्ये बियाणांची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल अशा लॉटमधील बियाणे शेतकऱ्यांना विक्री करू नये. ज्या बियाणांची क्षमता ७० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तेच बियाणे विक्री करावे.

शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे

उगवणक्षमता तपासणी केलेले बियाणेच खरेदी करावे, सोयाबीन बियाणांचे बाह्यकवच नाजूक असल्याने सदर बियाणांची धूळ पेरणी करू नये, बियाणे नाजूक असल्याने बियाणांच्या पिशव्यांची वाहतूक करताना तसेच साठवणूक करताना विशेष खबरदारी घ्यावी तसेच बियाणे खरेदी करताना बिलावरील बियाणे कंपनीचे नाव, लॉट नंबर बॅगवरील तपासणी करून घ्यावे, सोयाबीनची पेरणी साधारण १०० ते १२५ मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी.