यावेळी तहसीलदार दिनेश झांपले, ना.तहसीलदार संजय नागमवाड, निवडणूक ना.तहसीलदार संजय भोसीकर, शिवाजी जोगदंड, गाजूलवाड, खानसोळे, गवारगुरु मंडळ अधिकारी पठाण, लाटकर, कुराडे, मटपती, भुसेवार आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील ४५ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर प्रशिक्षणास आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी आरोग्य पथकामार्फत थर्मल स्कॅनिंग मिटर आधारे करण्यात आली असून सॅनिटायझरचा वापर यावेळी करण्यात आला आहे.
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना ई.व्ही. एम.मशीन हातळण्याचे प्रशिक्षण आय.टी.आय कर्मचारी पथका कडून देण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील निवडणूक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ना.तहसीलदार संजय नागमवाड यांनी केले तर आभार तहसीलदार दीनेश झांपले यांनी मानले.