शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

किचकट प्रोसेस व खर्चिक बाबीमुळे उमेदवारांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST

नेटवर्क नाही, विद्युत सेवा चार दिवसांपासून विस्कळीत भावी सरपंचाची तारंबळ मुखेड : जिल्ह्यात सर्वाधिक मुखेड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींची निवडणूक ...

नेटवर्क नाही, विद्युत सेवा चार दिवसांपासून विस्कळीत भावी सरपंचाची तारंबळ

मुखेड : जिल्ह्यात सर्वाधिक मुखेड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषणा झाली. यातील एक जांब बु. ग्रामपंचायत निवडणुकीस विभक्त झाल्यामुळे स्थगिती देण्यात आली असून सध्या १०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या किचकट प्रक्रिया व आर्थिक झळ यामुळे सामान्याचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न अधुरे राहत असल्याचे दिसून येत असून नेटवर्क नाही व विद्युत सेवा चार दिवसांपासून विस्कळीत झाल्यामुळे भावी सरपंचाची नामांकन अर्ज दाखल करण्यास तारंबळ होत आहे.

मुखेड तालुक्यात १२९ ग्रामपंचायती असून यातील मुदत संपलेल्या १०९ पैकी १०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सध्या प्रत्येक गावात निवडणूक रनधुमाळीस वेग आला असून २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र भरणे चालू झाले असून २३ डिसेंबर रोजी जरी निरंक असले तरी २४ डिसेंबर रोजी २५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर २७ डिसेंबर रोजी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मोठी गर्दी केली. तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते.

या ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भावी सरपंचांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून नेटवर्क नसणे व विद्युत पुरवठ्याचा अनियमितपणा याबरोबरच सलग तीन दिवस सुट्या यामुळे भावी सरपंचांची चांगलीच तारंबळ उडाली आहे.