शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी ढगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

शांतता समितीची बैठक बिलोली - बिलोली तालुक्यातील अर्जापूर व सुलतानपूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली.यावेळी ...

शांतता समितीची बैठक

बिलोली - बिलोली तालुक्यातील अर्जापूर व सुलतानपूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली.यावेळी कुंडलवाडीचे पोलीस निरीक्षक सुरेश मांटे यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले. बैठकीला शिवाजी पोरडवार, पोलीस पाटील संजय पतंगे, बालाजी मेडेकर, मुक्तार शेख, गौराजी शेटीवार, मोतीराम कदम, शब्बीर पटेल, आनंदा पतंगे, सिद्धार्थ पतंगे, संतोष घोनशेटवार, डी.बी. जहागीरदार, हणमंत कदम आदी उपस्थित होते.

श्रीमयी चमकली

हिमायतनगर - पुणे येथे आयोजित कीडस् ऑयोडल २०२० या सोलो डांस स्पर्धेत हिमायतनगरची श्रीमयी सूर्यवंशी ब गटात प्रथम आली.स्पर्धेचे परीक्षक मृदुंग देसाई यांनी केले. ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली.

अखंड हरिनाम सप्ताह

उमरी - तालुक्यातील हुंडा गंगापट्टी येथे अखंड हरिनाम सप्ताह चालू असून यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दररोज पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीराम कथा, हरीपाठ, हरीकीर्तन, हरीनाम जागर आदी कार्यक्रम चालू राहणार आहेत. लक्ष्मण पाटील, निळू कुदळेकर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. ३० डिसेंबर रोजी महाप्रसाद होईल.

रमेश पवार यांना पुरस्कार

लोहा - तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव आ. येथे कार्यरत रमेश पवार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव पुरस्कार जाहीर झाला. पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले. तसेच सामाजिक क्षेत्रातही चांगले काम केले आहे.

धम्मदेसना कार्यक्रम

लोहा - तालुक्यातील गोळेगाव येथे तपोवन बुद्धभूमीत ३ जानेवारी रोजी धम्मदेसना कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पूज्य भदंत बी.संघपाल थेरो हे धम्मदेसना देणार आहेत. कार्यक्रमासाठी परिसरातील उपासिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

गायकवाड यांचा सत्कार

भोकर - येथील एका विवाह समारंभाला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. त्यांचा सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसलवाड यांनी सत्कार केला. यावेळी ॲड.भानुदास कलवले, प्रा.राजू गोडसे, संगमेश्वर कलवले, वामनराव मोरताटे, प्रकाश गोरेकर, डॉ.सूर्यकांत सोनखेडकर, जनार्धन गुपिले, गणेश वाघमारे, योगेश गुंडाळे, संग्राम कलवले, अरुण कलवले आदींची उपस्थिती होती.

काँग्रेस स्थापना दिवस

उमरी - येथे माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील, बापूसाहेब पाटील, प्रकाश पाटील, शहराध्यक्ष किशोर पबितवार, दिगंबर गायकवाड, गजानन अडगुलवार, बालाजी सूर्यवंशी, साईनाथ गायकवाड, राजेश वर्मा, त्रिरत्न सवई आदी उपस्थित होते.

अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी

उमरी - तालुक्यातील ५७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५७५ कर्मचारी उपलब्ध आहेत. मात्र अजून २२५ अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली. जिल्हास्तरावरील वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला. प्रत्येक मतदान बुथवर ४ कर्मचारी नियुक्त आहेत. बुथची संख्या लक्षात घेता कर्मचारी संख्या कमी पडत आहे.