शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाच्या गोंधळालाही केंद्र शासनच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST

नांदेड - इंग्लंडने एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे लसीकरण उरकले. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मास्क काढून टाकला आहे. म्हणजेच ...

नांदेड - इंग्लंडने एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे लसीकरण उरकले. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मास्क काढून टाकला आहे. म्हणजेच लसीकरणावर विश्वास दाखविला आहे. आपल्याकडे मात्र सगळी गोंधळाची स्थिती आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकारचे नियोजन जबाबदार असल्याचा आरोप करीत महाराष्ट्राने यापूर्वीही लसीकरणासारख्या मोहिमा यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्राला केवळ डोस द्यावेत. लसीकरणाचे पूर्ण नियोजन करून ही मोहीम आम्ही यशस्वी करू, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. ते मंगळवारी ‘लोकमत’शी बोलत होते.

४५ वर्षांच्या पुढच्या नागरिकांना लस देण्याचे नियोजन केंद्र शासनाने केले. पहिला आणि दुसरा डोस कुणाला आणि कधी द्यायचा? याचे अधिकारही केंद्रालाच आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. मात्र ही मोहीम राबविताना केंद्र सरकार अद्यापही गंभीर नसल्याचे? दिसते. सध्याच्या संकटावर मात करायची असेल तर जितक्या लवकर लसीकरण पूर्ण होईल तितके चांगले आहे. मात्र आज मागणीनुसार लस उपलब्ध होत नाही. या मोहिमेमध्ये अनेक त्रुटी आहेत. लसीकरणासाठी केंद्राने ॲप तयार केला आहे. या ॲपमध्ये कुणी कुठूनही नाव नोंदवू शकतो. माझ्या जिल्ह्यातील घुलेवाडी गावात ४०० डोस आले होते. लसीकरणासाठी ४०० जणांनी नोंदणीही केली. यातील तब्बल १८० लोक हे बाहेर जिल्ह्यातील होते. शेजारच्या नाशिक, पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी नोंदणी केली असेल, हे एकवेळेस समजू शकतो. मात्र पार परभणीपासून हैदराबादपर्यंतचे नागरिक नोंदणी करून लसीकरणासाठी घुलेवाडीत येत असतील तर सिस्टीम म्हणून हे योग्य आहे का? असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला. असे अनेक मुद्दे आहेत. मात्र केंद्र सरकार ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही. लसीकरणासाठी महाराष्ट्राचे सर्व्हे करू द्या, अशी मागणी दोनवेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे. मात्र अद्यापही केंद्राकडून त्यास प्रतिसाद दिला नसल्याचे? थोरात यांनी सांगितले.

चौकट----------------

दोन भावाच्या भांडणात पाहुण्याला आणू नका

मागील अनेक वर्षांपासून नांदेड, लातूर विभागीय महसूल कार्यालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता अशा वादाच्या विषयावर बसून चर्चा करावी लागेल. नांदेड आणि लातूर हे दोन जिल्हे एकमेकांचे भाऊ आहेत. या दोन भावांच्या वादात मला पाहुण्याला का आणता? अशी मिश्कील टिप्पणी करीत थोरात यांनी या विषयावर स्पष्टपणे भाष्य करण्याचे टाळले.

चौकट-----------------

महाराष्ट्रात कुठेही आकड्यांची लपवालपवी नाही

पहिल्या लाटेचा यशस्वी मुकाबला केल्यानंतरही राज्य शासन गांभीर्याने कोरोनाला सामोरे जात होते. मात्र नागरिकच कुठे तरी थोडे बिनधास्त झाले होते. त्यामुळेच दुसरी लाट आल्याचे सांगत, या लाटेचाही महाराष्ट्र शासन गंभीरपणे सामना करीत आहे. आम्ही आकड्यांच्या बाबतीत कुठेही लपवालपवी केली नाही. महाराष्ट्रावर टीका करणाऱ्यांनी आज भाजपशासित राज्यात मृत्यूचे कसे तांडव सुरू आहे याकडेही पाहावे असे थोरात म्हणाले.

फोटो फाईल नेम - १८एनपीएचएमएवाय१४.जेपीजी