यातील तक्रारदार महिलेच्या मृत पतीने सन १९७४ मध्ये जामा मस्जिद भोकर शहरातील इनामी जमीन शेत गट क्र. ६४ मधील २ हेक्टर ५९ आर एवढी जमीन पुढील ९९ वर्षांसाठी करारनामा करून लिजवर घेतलेली आहे. या शेतातील धुऱ्यावर पिकांच्या संरक्षणासाठी सिमेंटचे १४८ खांब रोवून काटेरी कुंपणावर एक लाख तीन हजार ६०० रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या शेतीवर अतिक्रमण किंवा बळकावण्याच्या उद्देशाने यातील आरोपींनी संगनमत करून सदरील १४८ सिमेंट खांबाची व काटेरी कुंपणाची रविवारी रात्री नासधूस करून नुकसान केले. तसेच फिर्यादी महिलेस यापूर्वीही कुंपण काढून टाकू म्हणत धमकीही दिली होती. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी अब्दुल शफी अब्दुल खदीर इनामदार, तोशिफोद्दीन रजिवोद्दीन इनामदार, अब्दुल इम्तियाज अब्दुल खदीर, प्रशांत श्रीराम शिवेवार (सर्व रा. भोकर) यांच्या विरुद्ध कलम ४४७, ४२७, ५०६, ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार उमेश कारामुंगे पुढील तपास करीत आहेत.
शेतजमिनीचे कुंपण काढणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:43 IST