नांदेड- किनवट शहरातील एका चहाच्या हॉटेलातून मोबाईल लांबविण्यात आला. हीघटना२९डिसेंबर राेजी घडली. सचिन अशोक जाधव यांचे चहाचे हॉटेल आहे. ते माेबाईल दुकानात ठेवून एका ठिकाणी चहा देवून परत आले.यावेळी मोबाईल गायब दिसला. याप्रकरणात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
टाईम बाजार मटक्यावर धाड
नांदेड- शहरातील मालेगाव रस्त्यावरील एका गल्लीत सुरु असलेल्या टाईम बाजार मटक्यावर पोलिसांनी धाड मारली. २९ डिसेंबर राेजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी रोख सात हजार रुपये जप्त केले. या प्रकरणात पोउपनि आशिष बोराटे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविला.
दोन घटनांत सात हजारांची दारु जप्त
नांदेड- मांडवी आणि हिमायतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घटनात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेली सात हजार रुपयांची दारु पोलिसांनी पकडली आहे.
मांडवी ते नागापूर जाणार्या रस्त्यावर अडीच हजार रुपयांची देशी दारु पकडण्यात आली.तर हिमायतनगर रेल्वे गेटसमोर साडे चार हजार रुपयांची विदेशी दारु विनापरवाना नेण्यात येत होती.