शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

देगलुरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

देगलूर : सर्व बँकांना सलग तीन दिवस सुट्या आल्याने ग्राहकांसाठी या दिवसांत किमान एटीएम सुविधा उपलब्ध ठेवावी, याचे भान ...

देगलूर : सर्व बँकांना सलग तीन दिवस सुट्या आल्याने ग्राहकांसाठी या दिवसांत किमान एटीएम सुविधा उपलब्ध ठेवावी, याचे भान बँक व्यवस्थापनास राहिले नाही, असे स्पष्टपणे दिसून येत आहे.

देगलूर शहरात राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांच्या शाखा मोठ्या संख्येने आहेत. सर्वच बँकांचे व्यवस्थापक आपला कारभार वाढविण्यासाठी नागरिकांना ठेवी ठेवण्यासाठी विनवणी करतात आणि अशाप्रसंगी त्यांची गैरसोय होते. याकडे दुर्लक्ष केले जाते. या आठवड्याच्या शेवटच्या दिवसात सलग तीन दिवस सर्व बँकांचे व्यवहार बंद होते. साहजिकच पैसे काढण्यासाठी ग्राहकांंची एटीएमकडे गर्दी झाली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मोंढा कॉर्नर आणि मार्केट यार्ड शाखेचे दोन्ही एटीएम शुक्रवार व शनिवार या दोन्ही दिवशी बंद होते. महाराष्ट्र बँकेचे एटीएम सुरळीत अवस्थेत नव्हते. यामुळे ग्राहकांना पैैसे काढण्यासाठी गाव प्रदक्षिणा करावी लागलीच, शिवाय कोठेच काही हाती लागले नाही म्हणून मनस्तापाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीयीकृत बँकेत गेल्यानंतर काम वेळेवर होईल, यापेक्षा सौजन्याची वागणूक मिळेल की नाही, याची भीती वाटते. राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबुक प्रिंटर मशीन का चालू नाही या प्रश्नावर संबंधित कंपनीच्या अभियंत्यास कळविले आहे, असे ठरावीक साचाचे उत्तर अनेक महिन्यांपासून ऐकविले जात आहे.