शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

उमरीत फायनान्स कंपनीची फसवणूक प्रकरणी सर्व १९ आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

उमरी तालुक्यातील जामगाव येथील घटना लोकमत न्यूज नेटवर्क उमरी : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे बनावट कागदपत्रे ...

उमरी तालुक्यातील जामगाव येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरी : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे बनावट कागदपत्रे तयार करून १३ लाख ९२ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणातील उमरी तालुक्यातील जामगाव येथील सर्व १९ आरोपी फरार असून पोलिस त्यांचा कसून तपास करीत आहेत.

नमूना क्रमांक आठ , आधार कार्ड , रजिस्ट्री आदी कागदपत्रे सादर करुन बनावट सही व शिक्का वापरुन कंपनीची १३ लाख ९२ हजार ४८५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या प्रकरणात उमरी पोलिस ठाण्यात उमरी तालुक्यातील जामगाव येथील १९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे कर्ज मिळविण्यासाठी जामगाव ता. उमरी येथील काही जणांनी अर्ज केला होता. या अर्जासोबत बनावट कागदपत्रे तयार केली. नमुना क्रमांक आठ बनावट तयार करण्यात आले. त्यावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी आणि खोटे शिक्के मारण्यात आले होते. दुय्यम निबंधक कार्यालयात गहाण खत तयार करून त्याद्वारे १९ जणांनी तब्बल १३ लाख १२ हजार ४८५ रुपये कर्ज घेतले. पंरतु नंतरच्या काळात फायनान्सच्या तपासणीत दाखल केलेली सर्व कागदपत्रे ही बनावट असल्याचे उघडकीस आले. सर्व कर्जदारांनी कंपनीची फसवणूक केली. असे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढ होण्याची शक्यता आहे . या प्रकरणात कंपनीचे व्यवस्थापक मिलिंद सेलूकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन १९ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमरी पोलिसांनी रविवारी या प्रकरणातील काही आरोपींकडून याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी सदर प्रकरणी आम्हाला कसलीच माहिती नसल्याचे सांगून आम्ही महिंद्रा फायनान्स कंपनी कडून काहीच पैसे घेतले नसल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार आमच्या परस्पर झाल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे सदरील फसवणूकीचे प्रकरण बरेच गुंतागुंतीचे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उमरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशाच प्रकारे पैसे उचलून कंपनीची फसवणूक केल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे संगनमताने अनेक लोकांनी मिळून कंपनीची फसवणूक केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.टी. शेवाळे हे करीत आहेत.