शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करताना आरोपीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:17 IST

जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला जिल्ह्यात बिलोली आणि भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्याने दोन दुचाकी लांबविल्या. साहेबराव सय्याराम वाघमारे यांनी ...

जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

जिल्ह्यात बिलोली आणि भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्याने दोन दुचाकी लांबविल्या. साहेबराव सय्याराम वाघमारे यांनी एपी २५, एबी ५०६४ या क्रमांकाची दुचाकी बिलोली येथील सम्राट बारच्या बाहेर उभी केली होती. तर भोकर येथील गंदेवार कॉलनीतून बापूराव नागोराव गेडाम यांची एमएच २६, एएक्स ३१४६ या क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लांबविली. याप्रकरणात दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आला आहे.

दुकानात लावलेला एसी लांबविला

शहरातील आयटीआय चौकात असलेल्या एका मोबाइल शॉपीचा बाहेरुन स्टॅडवर लावलेला एसी चोरट्याने लांबविला. ही घटना ७ एप्रिल रोजी घडली. रितेश लक्ष्मीकांत व्यवहारे यांच्या स्काय लाईन कम्युनिकेशन दुकानात बाहेरुन लावलेला ४० हजार रुपयांचा एसी लांबविला. याप्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मारहाणीमुळे महिलेचा झाला गर्भपात

किनवट तालुक्यातील हमाल कॉलनी येथे विवाहितेला मारहाण करण्यात आली. त्यामुळे झालेल्या रक्तस्त्रावानंतर महिलेचा गर्भपात झाला. ही घटना ४ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित विवाहिता गर्भवती असताना पती आणि सासूने तुला बोलता येत नाही. आमचे नशीब फुटले. तुझ्या आईवडिलांनी आमची फसवणूक केली निघून जा असे म्हणून पीडितेला त्रास दिला. त्यानंतर पीडितेला मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे पीडितेचा गर्भपात झाला. या प्रकरणात शेख रहिम शेख अकबर, नाजियाबी शेख अकबर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि भोळे हे करीत आहेत.

दोन ठिकाणी धाडी, पाच हजारांची दारू जप्त

पोलिसांनी उस्माननगर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी धाडी मारून पाच हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. लोहा तालुक्यातील कलंबर बु. येथे साडेतीन हजार रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली. शहरात राजनगर पाटीजवळ १३०० रुपयांची दारू पकडली. या प्रकरणात दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.