शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST

गडगा : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या इच्छुक उमेदवारांची बँकेत खाते उघडण्यासाठी गडगा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत सोमवारी ...

गडगा : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या इच्छुक उमेदवारांची बँकेत खाते उघडण्यासाठी गडगा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाली. दरम्यान, निवडणूकपूर्व हालचाली सुरू झाल्या असून, कडाक्याच्या थंडीतही ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना बँकेत निवडणूक खर्चाचे स्वतंत्र खाते उघडणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या गडगा शाखेत सोमवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दुपारच्या वेळी बँकेला भेट दिली असता बँकेचे व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, रोखपाल, बँकेचे सारथी ही सर्व मंडळी कामात मग्न होती. त्यातच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान काढण्यासाठी शेतकरीही मोठ्या संख्येने आले होते. सलगपणे तीन दिवस बँकांना सुटी होती. त्याचाही परिणाम गर्दीच्या रूपात दिसून आला.

किनवट तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी तिसऱ्या दिवशी २८ उमेदवारी अर्ज दाखल; मंगळवारी व बुधवारी होणार गर्दी

किनवट : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस उरले असतानाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी २६ ग्रामपंचायतींचे २८ अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत ४१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत, अशी माहिती निवडणूक सूत्राने दिली.

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या ८२ प्रभागांच्या २२० जागांसाठी निवडणूक होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर असताना व सोमवार हा शुभ दिवस असतानाही सोमवारी केवळ २६ ग्रामपंचायतींचे २८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत मोठे अर्ज दाखल होतील, असे काहीसे चित्र आहे.