शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

चार प्रकल्पांत ४६ टक्के साठा

By admin | Updated: November 6, 2014 13:40 IST

जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे.

नांदेड : जिल्ह्यातील चार मोठय़ा प्रकल्पांमध्ये आजघडीला ५१.६५ तर मध्यम प्रकल्पात ४१.८ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक ७४ टक्के पाणी विष्णूपुरीत असले तरी, पुढील तीन महिन्यानंतर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर शेतकर्‍यांची रबीही संकटात सापडली आहे.
विष्णूपुरी बंधार्‍यामुळे शहरवासियांचा पाणीप्रश्न सुटला होता. या धरणाची क्षमता जवळपास ८0 दलघमी आहे. यंदा हे धरण १00 टक्के भरले होते. परंतु आजघडीला त्यात फक्त ५९.९ दलघमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मनपाला येत्या तीन महिन्यानंतर पाणीटंचाईचे नियोजन करावे लागणार आहे. परंतु त्यापूर्वी फेब्रुवारीमध्येच शहरवासियांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची दाट शक्यता आहे. 
जिल्ह्यातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ५१.७५ टक्के जलसाठा आहे. त्यात इसापूर प्रकल्पात ७२ टक्के पाण्याचा जिवंत साठा आहे. तर लोअर मनार प्रकल्पात-२४ टक्के, अप्पर मनार प्रकल्पात-३७ टक्के पाणी शिल्लक आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ४१.८ टक्के पाणी आहे. त्यात आमदुरा प्रकल्पात सर्वाधिक २३.७0 दलघमी एवढे पाणी आहे. दिग्रस प्रकल्पात-१८.७८ दलघमी, कारडखेड-५.२३ दलघमी, कुंदराळा- ३.३0१ दलघमी पाणी आहे. तर बाभळी बंधार्‍यात मात्र शून्य टक्के पाणीसाठा आहे. 
त्यामुळे जिल्हावासियांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात शेतकर्‍यांकडून रबी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. परंतु पिण्यासाठीच सध्या प्रशासनाकडून पाणी आरक्षित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची रबीही संकटात सापडली आहे. 
त्यात नुकतेच दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेला घास गेलेल्या शेतकर्‍यांना रबीपासून असलेल्या थोड्याफार अपेक्षांचा भंग होण्याची चिन्हे आहेत. /(प्रतिनिधी)