शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुक्यातील २७ गावातील १२४ जण अपात्रः

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

कंधार : गत ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विहित रितीने व विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. ...

कंधार : गत ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विहित रितीने व विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. तालुक्यात अशा १२४ जणांंना ५ वर्षाकरिता ग्रा.पं.निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले. त्यात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचे समोर आले आहे. आता सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत महिलेसाठी आरक्षित जागेवर उमेदवारी देताना गावपुढाऱ्यांची कसोटी लागत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक खर्चाचा हिशोब विहित रितीने व विहित मुदतीत दाखल करावे लागते. परंतु तसे केले नाही तर ग्रामपंचायत सदस्य राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाते. गत निवडणुकीतील तालुक्यातील २७ गावातील १२४ उमेदवारांनी खर्चाचा हिशोब वेळेत दाखल केला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यात पुरूष संख्येपेक्षा जवळपास दुप्पट संख्या महिलांची आहे.

१२४ अपात्र जणाची गावनिहाय अशी आहे. दाताळा -२ ,वरवंट -१ ,चौकीमहाकाया -१ ,मानसिंगवाडी -७ ,कळका -१ ,महालिंगी -१ ,देवयाचीवाडी -७ ,नंदनवन -९, हटक्याळ -५ ,शिर्शी बु. -६ ,कौठा -७ ,मरशिवणी -१ ,आंबुलगा -२ ,कुरूळा -१ ,गोणार -३ ,शिराढोण -१ ,जाकापूर- ७ ,वहाद-१० ,लाठ खु.-९ ,पेठवडज -६ ,बहाद्दरपूरा -१ ,काटकंळबा -१० ,बाचोटी -१ ,वाखरड-४, नावंदयाचीवाडी -७ ,भुत्याचीवाडी -५ ,उस्माननगर -९ आदींचा समावेश आहे.

अपात्र ठरविल्याने निवडणुकीची फेर राजकीय आखणी

आपल्या गटातील उमेदवार अपात्र ठरल्याने आताच्या राजकीय स्थितीची फेर आखणी करण्याचा प्रसंग गावच्या प्रस्थापित पुढाऱ्यांवर ओढवला आहे. काटकंळबा ,उस्माननगर ,पेठवडज ,वहाद ,कौठा आदी गावातील निवडणुका अतिशय चुरशीच्या ठरतात. गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी गत काही दिवसापासून राजकीय डावपेच आखले जात होते. त्यानुसार वॉर्डातील उमेदवारी निश्चित केली जात होती. परंतु अपात्रतेचा निर्णय धडकताच नवीन समीकरणे जुळवावी लागत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत गावपुढारी आपल्या वॉर्डातील राजकीय दबदब्यासाठी महिलांच्या आरक्षित जागेवर कुटुंबातील महिलांना उमेदवारी देतात. आणि सत्तेचा मार्ग सोपा करतात. मात्र अपात्रतेत महिलांची संख्या अधिक असल्याने पुढाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. काहींनी गतवेळा पराभव स्वीकारत या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी खटाटोप चालविला होता. काहींना सलग विजयाची आशा होती. परंतु अपात्रतेमुळे अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणाची जुळवणी करावी लागत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.