शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

दारू आणि हुक्क्याच्या नशेत झिंगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना आपल्या घरात दारू आणि हुक्का पार्टी करत आरडाओरड करणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना आपल्या घरात दारू आणि हुक्का पार्टी करत आरडाओरड करणाऱ्या पाच तरुण तसेच त्यांच्या आठ मैत्रिणींना अंबाझरी पोलिसांनी ताब्यात घेतले. दारूच्या नशेत झिंगाट झालेली या मंडळींनी शनिवारी मध्यरात्रीनंतर अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्मा ले-आऊट परिसरातील नागरिकांचा ताप वाढवला होता. रविवारी पहाटे अंबाझरी पोलिसांचे पथक गस्त करीत असताना त्यांना एका घरातून मोठमोठ्याने किंचाळणे, आरडाओरड ऐकू आली. त्यामुळे पोलिसांनी त्या घराचे दार ठोठावले. मात्र, आतमधील मंडळी सैराट होती. त्यांनी सुमारे अर्धा तास दार ठोठावूनही पोलिसांना दाद दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी बाजूच्या दाराने घरात प्रवेश केला. यावेळी तेथे कुशल संजय श्रीवास्तव (वय २८, रा.वर्मा ले-आऊट अंबाझरी), सागर अरुण बोडखे (वय २६, रा.गोदरेज आनंदम गणेशपेठ), धृव अजय शर्मा (वय २५, रा.शेल्टररिजेन्सी, नेल्सन चाैक) देव कन्वररंजित सबरवाल (वय २९, रा. डागा ले-आऊट) आणि अभिषेक अशोक धवड (वय २६, रा. जानकीधाम अपार्टमेंट, धंतोली) तसेच त्यांच्या आठ मैत्रिणी गोंधळ घालत दिसले. कोरोनापासून वाचण्यासाठी पोलिसांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले असताना ही झिंगाट मंडळी सैराट सारखा डान्स करीत होती. त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या आणि हुक्का पॉटही आढळले. पोलिसांनी ते जप्त करून उपरोक्त मंडळींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता साहू, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक राहुल शिरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येत सैराट मंडळीला बघण्यासाठी गोळा झाली होती.

---

तलवारीने केक कापला

शनिवारी याच पोलीस पथकाने बर्थ डे केक तलवारीने कापून सिनेमातील गुंडासारखा स्वत:चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या प्रवीण शामराव खंडारे (वय३०, रा. जयनगर, अंबाझरी) या गुंडाच्याही मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली.

---