शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टी रंगभूमी : प्रमुख कंपन्यांना रसिकांकडून आमंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 11:24 IST

झाडीपट्टी रंगभूमी यंदा विवंचनेत आहे. या रंगभूमीवर कार्यरत असलेल्या नाट्यनिर्मात्यांपुढे नाट्यप्रयोगांची संख्या घसरल्याचे संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देस्टार कलावंतांच्या मानधनवाढीने निर्माते संकटात

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाडीपट्टी रंगभूमी यंदा विवंचनेत आहे. या रंगभूमीवर कार्यरत असलेल्या नाट्यनिर्मात्यांपुढे नाट्यप्रयोगांची संख्या घसरल्याचे संकट निर्माण झाले आहे. प्रयोगांची संख्या न वाढल्यास सीझनमधील आर्थिक गणितांचा पेच कसा सोडवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्टार कलावंतांनी मानधनात प्रचंड वाढ केल्याने, ही समस्या उपस्थित झाल्याचे बोलले जात आहे.झाडीपट्टी रंगभूमीवर दिवाळीपासून पुढची चार महिने नाटकांचा सीझन चालतो. हजारो नाट्यप्रयोग दरवर्षी होत असतात. २०१८-१९ च्या सीझनमध्ये तब्बल तीन हजार नाट्यप्रयोग सादर झाले. यंदा मात्र अनेक कारणांनी नाट्यप्रयोगांची संख्या रोडावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सर्वात प्रमुख कारण म्हणून स्टार कलावंतांनी आपल्या मानधनात प्रचंड वाढ केली आहे. इथे खलनायकाची भूमिका पार पाडणारे कलावंत सुपरस्टार असतात आणि तेच सर्वाधिक मानधन घेत असतात. त्याखालोखाल किंवा तोडीचे मानधन महिला अभिनेत्रीला मिळत असते. त्यानंतरचे मानधन कॉमेडियनला मिळत असते. विशेष म्हणजे हे तीन पात्र इकडील रंगभूमीवर सादर होणाऱ्या प्रत्येक नाटकांचे प्रमुख पात्र असतात आणि त्यांच्यावरच रसिकांची गर्दी विसंबून असते. याच कलावंतांनी मानधनात कुठे दीडपट तर कुठे दुप्पट वाढ केल्याने, निर्मात्यांची पंचाईत झाली आहे. आतापर्यंत येथील काहीच स्टार कलावंत सहा ते आठ हजार रुपयापर्यंत नाईट घेत होते. यंदा नव्याने स्टार झालेल्या कलावंतांनीही आपले मानधन आठ ते दहा हजार रुपयापर्यंत वाढवले आहे. तर ज्यांच्या नावावरच रसिकांची गर्दी होते, अशा कलावंतांनी आपली नाईट १५ हजार रुपयांपर्यंत केली आहे. त्यामुळे निर्मात्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. स्टार नटांनी मानधनात वाढ केल्याने निर्मात्यांनीही प्रयोगांची किंमत वाढवली आहे. गेल्यावर्षीपर्यंत एक प्रयोग ४० ते ४५ हजार रुपयांत विकला जात असे. यंदा प्रयोग ५५ ते ६० हजार रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे नाट्यप्रयोग घेणाºया मंडळांनी नाटक न करण्याचा निर्णय घेतल्याने, निर्माते पेचात आहेत.

पोस्टरवर फक्त चेहरेच, बुकिंग नाही - प्रल्हाद मेश्रामस्टार कलावंतांच्या चेहऱ्यावर नाट्यप्रयोगांना बुकिंग मिळण्याचा काळ ओसरल्याचे यंदाच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे. पोस्टरवरील चेहरे बघून यंदा बुकिंग होत नसल्याचे दिसून येते. प्रमुख कंपन्यांच्या नाट्यप्रयोगाची संख्या घसरलेली असेल, असे वाटत असल्याचे अखिल झाडीपट्टी विकास संस्था (महामंडळ) व अखिल झाडीपट्टी नाट्यनिर्माता संघटनेचे सचिव प्रल्हाद मेश्राम यांनी सांगितले.

स्थानिक कंपन्यांनी निर्माण केला पेचझाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांची प्रमुख बाजारपेठ म्हणून वडसा हे केंद्र सर्वपरिचित आहे. येथे ५५ कंपन्या आहेत. स्थानिकांच्याही १२ नव्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. सगळेच नवखे असल्याने जादा मानधनाचा विषय नाहीच आणि त्यामुळेच त्यांचे प्रयोग २८ ते ३५ हजारात स्थानिक मंडळांना उपलब्ध होत आहेत. या स्थानिक कंपन्यांनीच प्रस्थापित मंडळांपुढे पेच निर्माण केला आहे.

प्रयोगांची संख्या अर्ध्यावरगेल्या वर्षी तीन हजार प्रयोग या झाडीपट्टीत झाले होते. ५५ प्रमुख कंपन्यांपैकी सहा कंपन्यांना १०० ते १३० प्रयोग, १२ कंपन्यांना ७० ते ९० प्रयोग, २० कंपन्यांना ४० ते ६० प्रयोग, सात कंपन्यांना ३० ते ३५ प्रयोग आणि १० कंपन्यांना १५ ते २५ असे कमी-जास्त प्रयोग मिळाले होते. यंदा मात्र या कंपन्यांकडून सादर होणाऱ्या नाटकांचे प्रयोग कुणाचे अर्ध्यावर तर कुणाचे दरवर्षीपेक्षा ३० टक्के प्रयोग घसरले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या १२ स्थानिक कंपन्यांनी घुसखोरी केली असून, साधारणत: ३०० ते ३५० प्रयोग आपल्या नावे केले आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिक