शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसने रोखली दिल्लीला जाणारी रेल्वे

By admin | Updated: August 22, 2014 01:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे करून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २० मिनिटे मंगळवारी रेल्वे क्रॉसिंगजवळ दिल्लीला जाणारी रेल्वेगाडी

विदर्भाची मागणी रेटली : २० मिनिटे केली जोरदार नारेबाजीनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे करून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २० मिनिटे मंगळवारी रेल्वे क्रॉसिंगजवळ दिल्लीला जाणारी रेल्वेगाडी रोखून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी रेटून धरली.मंगळवारी रेल्वे क्रॉसिंगजवळ दुपारी ४ वाजता रामटेक लोकसभा युवक काँग्रेस महासचिव शहबाज सिद्दीकी, फिरोज बुवा, नदीम मलिक, सलीम खान, नदीम जमा, अमित पाठक, आलोक पुंडपवार, शेख शफीक, वसीम खान आणि ३५ विदर्भवाद्यांनी दिल्लीला जाणारी रेल्वेगाडी रोखून धरली. रेल्वेगाडी थांबविल्यानंतर या गाडीच्या इंजिनपुढे उभे राहून या पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे बॅनर हातात घेऊन नारेबाजी सुरू केली. जवळपास २० मिनिटे ही नारेबाजी सुरू होती. रेल्वेगाडी थांबल्यानंतर गाडीतील प्रवासी खाली उतरले आणि त्यांनीसुद्धा वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देऊन वेगळ्या विदर्भाला आपले समर्थन जाहीर केले. गाडीचा लोकोपायलटही खाली उतरला आणि त्याने आंदोलनकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)सुरक्षा यंत्रणा, रेल्वे प्रशासन गाफीलरेल्वेगाडी रोखून धरण्याच्या घटनेबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त इब्राहिम शरीफ यांना विचारणा केली असता याबाबत नियंत्रण कक्षातून कुठलाच निरोप आला नसून, घटनास्थळी एका निरीक्षकाला पाठविल्याची माहिती दिली. रेल्वेगाडी रोखून धरली असेल तर संबंधितांची माहिती घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनीसुद्धा अशी कुठलीच घटना घडल्याची माहीत नसल्याचे सांगितले. यावरून रेल्वेची सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन किती गाफील आहे, याचीच प्रचिती आली.