शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दिसलीस तू, फुलले ऋतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

- व्हॅलेंटाइन डे : प्रेमोत्सवाच्या वसंतात दिसली शिशिरातील गळती - संस्कृतीरक्षकांचा इशारा पडला भारी, प्रेमवीरांनी धरला गावाबाहेरचा रस्ता लोकमत ...

- व्हॅलेंटाइन डे : प्रेमोत्सवाच्या वसंतात दिसली शिशिरातील गळती

- संस्कृतीरक्षकांचा इशारा पडला भारी, प्रेमवीरांनी धरला गावाबाहेरचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऋतूत ऋतू वसंत आणि हा ऋतू प्रेमभावनेस पूरक आहे, असे मानले जाते. सध्या वसंताच्या आगमनाला दीड महिन्याचा अवकाश आहे आणि शिशिराचा अनुभव घेताे आहोत. शिशिरात वृक्षवेलूंची पर्णगळती सर्वत्र दिसून येत आहे. पर्णगळती उदासीनतेचे प्रतीक असले तरी जुने जळमटे टाकून देऊन नव्याची चाहून देणारा अर्थात मार्गस्थ होण्याचा संदेश देणारा हा ऋतू. ‘व्हॅलेंटाइन डे’ला अघोषित वसंत फुलत असतो. यंदा प्रेमोत्सवाचा हा दिवस शिशिरात आला आणि त्याचा प्रभावही दिसून आला. एरवी दरवर्षी व्हॅलेंटाइन डे जल्लोषात, हर्षोल्लासात साजरा होतो. यंदा मात्र, तो जल्लोष दिसून आला नाही. कदाचित संस्कृतीरक्षकांच्या विरोधाची आणि कोरोनाच्या प्रादुर्भावाची धास्ती म्हणून या जल्लोषाला गळती लागली असावी, असा अंदाज घेता येतो. ‘

‘व्हॅलेंटाइन डे’ला दरवर्षी शहर प्रेमवीरांनी, मित्र-मैत्रिणींच्या गलबलाटाने उजळून निघतो. यंदा मात्र तसे चित्र कुठेच दिसून आले नाही. विकासकामे सुरू असल्याने फुटाळा तलाव परिसर रिकामा होता. वस्ताद लहुजी साळवे अर्थात अंबाझरी उद्यानातही जोडपी उणिवेनेचे फिरकली होती. रविवार असल्याने शहरातील महाराजबागसारखी उद्याने कुटुंबीयांनी गजबजली होती. एरवी प्रेम बहर फुटलेली तरुण-तरुणींची टोळकी सिव्हिल लाइन्ससारख्या हिरवळीने नटलेल्या व पॉश इलाक्यात विहार करताना आढळायची. मात्र, ‘व्हॅलेंटाइन डे’ला ते रस्तेही ओसाड पडले होते. त्यामुळे, आज शहरात प्रेमोत्सव साजरा करण्यास प्रेमवीरांनी नकार दिला का, असा प्रश्न पडला होता. मात्र, या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येते. कारण, व्हॅलेंटाइन डे आणि त्यातल्या त्यात रविवारचा अवकाश सापडल्याने जवळपास सर्वच तरुण-तरुणी-प्रेमवीरांनी गावाबाहेरचा अर्थात शहराच्या जवळच्या पर्यटन स्थळांकडे मोर्चा वळवला होता. त्यातच संस्कृतीरक्षकांचा रोष, हेही एक महत्त्वाचे कारण होते. नसल्या खटाटोपीपेक्षा बाहेरचा रस्ता बरा, या समजाने सगळे प्रेमवीर गावाबाहेर पळाले होते.

दिवसभर शहरात शांतता होती खरी. मात्र, संध्याकाळ होत असताना टेडीबीअर, फ्लॉवर स्पॉट आदींवर गर्दी वाढायला लागली होती. अनेकांनी खाजगीतच ‘व्हॅलेंटाइन डे’चा सोहळा आयोजित केला होता. दिवसभर शांत असलेले नागपूर रात्री मात्र प्रेमवीरांच्या जल्लोषाने भारले होते.

हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये दिसली नाही तयारी

दरवर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठमोठी हॉटेल्स, रेस्टॉरंटकडून विशेष आयोजन होत असते. शहराच्या काठावर असलेले ढाबेही सज्ज असतात. मात्र, बहुतांश हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे चालकांनी यंदा सजावटीकडे कानाडोळाच केलेला दिसून आला. मोठ्या हॉटेल्समधील आयोजन तसेही बाहेर दिसून पडत नाही. तरीही यंदा कोरोनाच्या फटक्याने हे व्यावसायिक हवालदिल असल्याचेच दिसून आले.

मातृपितृ पूजन दिनही पाळला गेला

काही धार्मिक संघटनांकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ला पर्याय म्हणून त्याच दिवशी मातृपितृ पूजन दिनाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने शहरात मातृपितृ पूजनाचे छोटेखानी सोहळे पार पडले. काही ठिकाणी या दिवसाच्या निमित्ताने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

अनेकांनी केले पुलवामा घटनेचे स्मरण

२०१९ मध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीच पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भेकड हल्ल्यात ४० हून जास्त सीआरपीएफच्या जवानांना विरगती प्राप्त झाली होती. त्या घटनेने अवघा भारत सुन्न पडला होता. त्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनेकांनी सैनिकांच्या शौर्याला सलाम करत, दहशतवादाची निंदा केली.

...............