शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यविस्तारासाठी संघाचा ‘योग’

By admin | Updated: March 23, 2015 02:16 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील साडेसहा लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु अनेक ठिकाणी बंद पडलेल्या शाखा हा संघाच्या चिंतेचा विषय आहे.

योगेश पांडे नागपूरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील साडेसहा लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु अनेक ठिकाणी बंद पडलेल्या शाखा हा संघाच्या चिंतेचा विषय आहे. २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या माध्यमातून बंद पडलेल्या शाखांना पुनरुज्जीवित करण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी जनतेत जास्तीतजास्त प्रमाणात जाऊन योग दिवस व योग सप्ताहाचा प्रचार करण्याची योजना स्वयंसेवकांकडून तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपुरात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत योगविद्येचा प्रसार करण्यासंदर्भातला प्रस्ताव संमत करण्यात आला होता. केंद्र व राज्य शासनांनी याला शैक्षणिक अभ्यासक्रमांत स्थान द्यावे, अशी सूचनादेखील या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्यात आली. योगविद्येचा प्रचार व प्रसार व्हावा ही संघाची यामागील भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसापूर्वी १४ ते २० जून हा आठवडा देशभरात योग सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान संघाच्या शाखांमध्ये तसेच संघपरिवारातील विविध संघटनांच्या वतीने योगविद्येच्या प्रसारासंदर्भात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरात संघाच्या शाखांमध्ये सुमारे १८ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी अनेक ठिकाणच्या शाखा बंद पडल्या आहेत. या शाखांचे कार्य परत सुरू करण्यासाठी योग सप्ताहाचा उपयोग करण्याचा संघाचा मानस आहे. त्यादृष्टीने संबंधित शाखांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहोचून जास्तीतजास्त लोक परत कसे जुळतील यासाठी प्रयत्न करण्याची योजना असून, स्वयंसेवकांनी त्यादृष्टीने प्राथमिक काम सुरू केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)