शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

याकूबची स्ट्रॅटेजी

By admin | Updated: July 22, 2015 03:13 IST

फाशीच्या शिक्षेतून माफी मिळावी, यासाठी याकूब मेमनने राज्यपालांकडे केलेला दयेचा अर्ज पूर्वनियोजित स्ट्रॅटेजी आहे.

नरेश डोंगरे  नागपूरनव्याने दयेचा अर्ज : वकिलांनी पूर्वीच दिले होते संकेत फाशीच्या शिक्षेतून माफी मिळावी, यासाठी याकूब मेमनने राज्यपालांकडे केलेला दयेचा अर्ज पूर्वनियोजित स्ट्रॅटेजी आहे. विशेष म्हणजे, असे काही केले जाणार याचे संकेत याकूबच्या स्थानिक वकिलाने सोमवारी रात्री तर, दिल्लीतील वकिलाने मंगळवारी दुपारीच दिले होते. त्यामुळे याकूबची ही व्यूहरचना कोणत्या वळणावर जाते आणि त्यासाठी किती कालावधी लागतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, याकूब मेमनने १२ मार्च १९९३ ला मुंबईत भीषण बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली. यात २५७ निरपराध लोकांचे बळी गेले तर ७०० पेक्षा जास्त लोकांना दुखापत झाली होती. बॉम्बस्फोटानंतर दाऊद, टायगर आणि याकूब देशातून पळून गेले होते. त्यानंतर याकूबला अटक करण्यात आली. हा समर्पणाचा प्रकार होता, असे बोलले जात होते. दरम्यान, टाडा कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. प्रकरणात १२३ आरोपी होते. त्यातील १२ जणांना मृत्युदंडाची शिक्षा, २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. ६८ लोकांना वेगवेगळी शिक्षा सुनावण्यात आली तर २३ लोकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली; नंतर सर्वोच्च न्यायालयाने १२ आरोपींपैकी ११ जणांचा मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित केली तर याकूब मेमनला कटाचा सूत्रधार मानत त्याच्या मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली. परिणामी याकूब मेमनने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. दरम्यान, याकूबचा डेथ वॉरंट निघाल्यामुळे याचिकेच्या सुनावणीकडे देश-विदेशातील नागरिकांचे लक्ष लागले होते. ही याचिका न्यायालयाने मंगळवारी दुपारी खारीज केली.त्यामुळे याकूबचा शेवटचा पयार्यही संपल्याची देशभर चर्चा सुरू झाली. वकिलांनी दिला पर्याय नागपूर : याकूबला आता ३० जुलैला फासावर टांगण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त प्रसारित होत असतानाच सायंकाळी ६ च्या सुमारास याकूबचे स्थानिक वकील अ‍ॅड. अनिल गेडाम यांनी याकूबने दयेचा अर्ज केल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटाच्या संबंधाने नवा विषय सर्वत्र चर्चेला आला. विशेष म्हणजे, मंगळवारी क्युरेटिव्ह याचिकेची सुनावणी असताना अ‍ॅड. गेडाम यांनी सोमवारी दुपारी कारागृहात जाऊन याकूबची भेट घेतली होती. त्यानंतर सायंकाळी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना ‘याचिका खारीज झाल्यास’ आमचे अन्य पर्याय शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले होते. हे पर्याय कोणते, ते सांगण्याचे त्यांनी टाळले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी याकूबचे दिल्लीतील वकील अ‍ॅड. शुबेल फारुख नागपुरात आले. त्यांनीही उस्मान मेमनला घेऊन कारागृहात याकूबची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ‘क्युरिटीव्ह‘ आणि त्यानंतर काय, याबाबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर ते बाहेर आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचे सांगितले. क्युरिटीव्ह खारीज झाल्यास काय, या प्रश्नावर त्यांनी कायद्यानुसार पर्याय खुले असल्याचे सांगून, पुन्हा मार्ग शिल्लक असल्याचे सूचक संकेत दिले. त्यावेळी याचा उलगडा झाला नव्हता. दरम्यान, दुपारी २.३० च्या सुमारास न्यायालयाने क्युरिटीव्ह याचिका खारीज केली. त्यानंतर अ‍ॅड. अनिल गेडाम पुन्हा कारागृहात याकूबच्या भेटीला गेले. त्यानंतर याकूबने राज्यपालांकडे दयेचा अर्ज केल्याचे उघड झाले. सोबतच दोन्ही वकिलांकडून सुचविण्यात आलेला पर्याय म्हणजे ‘याकूबने केलेला दयेचा अर्ज होय‘, हे स्पष्ट झाले. सोबतच याकूबची स्ट्रॅटेजीही उजेडात आली. दरम्यान, बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला शिक्षा ठोठावल्यानंतर त्याची कायदेशीर अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया तब्बल २२ वर्षांनंतर सुरू झाली. मात्र, मंगळवारी पुन्हा एक पर्याय पुढे आल्यामुळे शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी आणखी किती कालावधी लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.