शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

जागतिक कर्करोग दिन; ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ आणि स्तनाचा कर्करोग वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:10 IST

कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत सापडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागात २०१८ या वर्षात २४०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये कर्करोगाचे २४०० नवे रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत सापडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागात २०१८ या वर्षात २४०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुरुषांमध्ये ‘हेडअ‍ॅण्ड नेक कॅन्सर’ तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढत असल्याचे समोर आले आहे. ‘ग्लोबोकॉन २०१८’ अहवालानुसार गेल्या वर्षात भारतात स्तनाच्या कर्करोगाचे १,६२,४६८ (१४ टक्के) रुग्ण आढळून आले. ‘हेड अ‍ॅण्ड नेक’चे १,१९,९९२ (१०.४ टक्के), गर्भाशय कर्करोगाचे ९६,९२२ (८.४ टक्के), फुफ्फुस कर्करोगाचे ६७,७९५ (५.९ टक्के), पोटाच्या कर्करोगाचे ५७,३९४ (५ टक्के) रुग्ण तर इतर कर्करोगाचे ६,५२,७२३ (५६.४ टक्के) रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात ७ लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यूदेशात २०१८ मध्ये ११,५७,२९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील ७ लाख ८४ हजार रुग्णांचे मृत्यू कर्करोगाने झाले आहेत. ७५ वर्षांवरील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक आहे. पुरुषांमध्ये ७.३४ टक्के तर महिलांमध्ये हे प्रमाण ६.२८ टक्के आहे.

दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाचा कॅन्सर२०१४ मधील नागपुरातील कॅन्सरच्या आकडेवारीनुसार, इतर कॅन्सरच्या तुलनेत ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’चे सर्वाधिक म्हणजे २२.७ टक्के रुग्ण होते. दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाच्या कॅन्सरचे १५.१ टक्के तर स्तनाच्या कॅन्सरचे १४.९ टक्के रुग्ण होते. परंतु आता ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ पहिल्या क्रमांकावर कायम असून दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न रेंगाळलेलाचगेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेडिकलमधील कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न गेल्या वर्षीही मार्गी लागलेला नाही. विशेष म्हणजे, शासनाने या हॉस्पिटलसाठी बांधकाम न करताच यंत्रसामुग्रीसाठी २० कोटी रुपये दिले आहेत. परंतु इमारत नसताना यंत्रसामुग्रीसाठी देण्यात आलेला हा निधी वादात सापडला आहे.

२५०ने वाढली कर्करोगाची ओपीडीमेडिकलच्या कर्करोगातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) २०१५ मध्ये २२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. २०१६ मध्ये ही संख्या २१५७ होती, २०१७ मध्ये ही संख्या कायम असताना २०१८ मध्ये २५० ने वाढ होऊन २४०७ वर पोहचली आहे. यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.-डॉ. अशोक दिवाणप्रमुख कर्करोग विभाग, मेडिकल

कॅन्सर ‘नोटीफायबल डिसीज’नाहीराज्यात ‘एचआयव्ही’, स्वाईन फ्लू आदी रोगांच्या ‘नोटीफायबल डिसीज’ म्हणून नोंदी होतात. यामुळे या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न होतात, परंतु कर्करोग ‘नोटीफायबल डिसीज’मध्ये येत नाही. परिणामी कुठला कर्करोग वाढत आहे, किती रुग्ण आहेत याची नोंदच होत नसल्याने या रोगावरील नियंत्रणात शासन कमी पडत आहे.-डॉ. कृष्णा कांबळेकर्करोग विभाग, मेडिकल

टॅग्स :cancerकर्करोग