नागपूर : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरमध्ये नुकताच वर्ल्ड कॅन्सर डे साजरा करण्यात आला. दरम्यान, तज्ज्ञांनी जगात वाढत असलेल्या कॅन्सरच्या रुग्णांच्या बचावासाठी काय खबरदारी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले. यावेळी सक्षमचे राष्ट्रीय सहसचिव आणि सीएएमबीएचे कंट्री डायरेक्टर सिनिअर हेल्थ स्पेशालिस्ट डॉ. संतोष कुमार क्रालेती, निम्सच्या विभागप्रमुख न्यूरो सर्जन डॉ. विजयासारधी मुदुंबा, निम्सच्या सिनिअर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मेहर लक्ष्मी कोनतम, अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट सिटीझन हॉस्पिटलचे सिनिअर सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कृष्ण किरण कन्नेपल्ली, नागपूर ऑब्स्टेट्रिक गायनाकॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वैदेही मराठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मराठे यांनी हस्तनिर्मित ब्रेस्ट प्रोस्थेसिसचे वितरण वक्षासंबंधी उपचार करणाऱ्या गरजू महिलांना केले. यावेळी निटेड नॉकर्सच्या गायनाकॉलॉजिस्ट आणि कर्करोगावर मात करणाऱ्या डॉ. रोहिणी पाटील, एनसीआय मेडिकल डायरेक्टर डॉ. आनंद पाटील यांनी विचार व्यक्त केले. आभारप्रदर्शन एनसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केले. (वा.प्र.)
...