शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस, आयपीएस ध्येय असणाऱ्यांसाठी कार्यशाळा

By admin | Updated: January 2, 2017 02:26 IST

आजच्या तरुण पिढीपुढे आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी यासारख्या सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या

८ जानेवारी रोजी मोफत आयोजन : लोकमत युवा नेक्स्ट व अ‍ॅग्ररिअनच्या राठोड अकॅडमीचा उपक्रम नागपूर : आजच्या तरुण पिढीपुढे आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी यासारख्या सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता भरपूर सुवर्णसंधी आहेत. या सेवेत जाण्याकरिता या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. याच अनुषंगाने लोकमत युवा नेक्स्ट व अ‍ॅग्ररिअन राठोड अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमाने आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपीचे ध्येय बाळगणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकरिता मोफत कार्यशाळेचे आयोजन ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यशाळेत तज्ज्ञ मंडळीतर्फे या विषयाची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पाचवी ते बारावी, अंडर ग्रॅज्युएट व ग्रॅज्युएटपर्यंतच्या सर्व विद्यार्थी पालकांकरिता या परीक्षा संदर्भातील गैरसमज, शालेय जीवनापासूनच या परीक्षांची तयारी अशा महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व प्रथम विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या या परीक्षासंदर्भातील मानसिक तयारी व्हावी, या दृष्टीने युपीएससी, एमपीएससीची ओळख करून देण्यात येईल तसेच युपीएससी सिव्हील सर्व्हिस परीक्षा व एमपीएससी राज्यसेवा परीक्षांमधून असणारे विविध प्रकारचे नोकरीचे पर्याय आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर या परीक्षेला लागणारी पात्रता, परीक्षेचे वेळापत्रक, या परीक्षेची संरचना व अभ्यासक्रम या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. तर मग काय, इयत्ता पाचवी ते ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक या मोफत कार्यशाळेकरिता निमंत्रित आहेत. नावनोंदणीकरिता विद्यार्थ्यांनी अनुश्री बक्षी ९८२२४०६५६२, राठोड सर ७७५६०३६५३८ या मोबाईल क्रमांकावर किंवा लोकमत भवन, रामदासपेठ येथे संपर्क संपर्क करून आपली जागा राखीव करून घ्यावी. (प्रतिनिधी)