शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:54 IST

नागपूर : महाराष्टÑ सुरक्षा दलाचे सुरक्षारक्षक गेल्या २० दिवसांपासून संपावर गेल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा जीव टांगणीला लागला आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करीत शनिवारपासून बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) वेळात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने घेतला.आहे.मेडिकलमधील कुचकामी सुरक्षा व्यवस्था ...

ठळक मुद्देमेडिकल;सुरक्षेचा मुद्दा रेटला : ओपीडीत नाही देणार सेवा

नागपूर : महाराष्टÑ सुरक्षा दलाचे सुरक्षारक्षक गेल्या २० दिवसांपासून संपावर गेल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा जीव टांगणीला लागला आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करीत शनिवारपासून बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) वेळात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने घेतला.आहे.मेडिकलमधील कुचकामी सुरक्षा व्यवस्था व डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांना घेऊन मागील वर्षी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ संपावर गेली होती. अखेर सरकारने राज्यभरातील सर्व मेडिकलच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्टÑ सुरक्षा दलाकडे सोपविली. परंतु या दलातील सुरक्षा रक्षकांनी पगारवाढ व नोकरीवर कायम करण्याच्या मागणीला घेऊन १९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला. विशेष म्हणजे, २१ दिवस होऊनही या संपावर तोडगा निघाला नाही. यामुळे रुग्णालयच्या वॉर्डा-वॉर्डात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी वाढली असून डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरक्षेला घेऊन ‘मार्ड’ संघटनेने वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनाही निवेदन दिले. परंतु अद्यपाही उपाययोजना नाही. अखेर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सर्व निवासी डॉक्टरांनी दंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन केले तर सायंकाळी अधिष्ठाता कार्यालयासमोर नारे-निर्दशने केली.अधिष्ठात्यांनी मागितला दोन दिवसांचा वेळअधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. तोपर्यंत सुरक्षा रक्षकावर तोडगा निघेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. याला घेऊन रात्री मार्डची बैठक झाली. या बैठकीत शनिवारपासून ओपीडीच्या वेळेत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.-डॉ. प्रदीप कासवानअध्यक्ष, मार्ड मेडिकलसुरक्षेला घेऊन संचालकांना दिले पत्रमार्डच्या मागणीला घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संचालकांना पत्र पाठविले आहे. यात सुरक्षा रक्षक पुरविण्याबाबत निर्णय घेण्याचे म्हटले आहे. येत्या दोन दिवसांत यावर निर्णय होईल, अशी शक्यता आहे.-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल