शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांनीच रोखली बोअरवेलची कामे !

By admin | Updated: October 29, 2015 03:23 IST

उन्हाळ्याच्या दिवसात टंचाईग्रस्त गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०१४- १५ च्या टंचाई निवारण आराखड्याला प्रशासनाने मंजुरी दिली होती.

जिल्हा परिषद : जलव्यवस्थापन समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्हनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात टंचाईग्रस्त गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०१४- १५ च्या टंचाई निवारण आराखड्याला प्रशासनाने मंजुरी दिली होती. ग्रामीण भागातील लोकांना पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रयत्नाने ११६० बोअरवेल मंजूर करण्यात आल्या होत्या. परंतु पदाधिकाऱ्यांनी ही कामे रोखल्याने ४८२ कामे झाली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पदाधिकारीच विकास कामात आडकाठी आणत असल्याने जिल्ह्याचा विकास कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक गावात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण होते. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या संकटावर मात करण्यासाठी टंचाई निवारण आराखडा तयार केला जातो. शासनाकडून यासाठी निधी उपलब्ध केला जातो. गेल्या वर्षी जिल्ह्यतील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा. यासाठी ११६० बोअरवेल मंजूर करण्यात आल्या यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात आला. पाणीपुरवठा विभागाने यासाठी नियोजन केले होते. बोअरवेलची कामे युद्धपातळीवर सुरु केली. मोठ्या प्रमाणात कामे होत असताना पदाधिकाऱ्यांनीच यात आडकाठी आणली. त्यामुळे मंजूर असूनही ४८२ कामे करता आली नाही. पदाधिकाऱ्यांना विकास कामे नको का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात व जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असल्याने तक्रार करूनही उपयोग नसल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. काही अधिकारी इतरत्र बदली करण्याच्या प्रयत्नात असल्याची जि.प.मध्ये चर्चा आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील मामा तलाव व सिंचन तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने सिंचन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या तलावांचा सिंचनासाठी उपयोग होत नाही. समितीच्या बैठकीत ही बाब निदर्शनास आणल्यानंतरही कार्यवाही होत नाही. बैठकीत घेण्यात आलेले ठराव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले जात नाही. तसेच वृक्षारोपण मोहीम राबविताना सार्वजनिक ठिकाणी झाडे न लावता शेतकऱ्यांच्या बांधावर लावल्यास झाडे जगतील. शेतकऱ्यांना फळझाडापासून उत्पन्न मिळेल असा प्रस्ताव सदस्यांनी मांडला होता. परंतु या प्रस्तावाचा विचार करण्यात आला नाही, अशी व्यथा काही सदस्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)