शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कामगार रुग्णालयाला कामगार दिनाचा विसर

By admin | Updated: May 2, 2015 02:28 IST

१ मे, जागतिक कामगार दिन, हा जगभरातील कामगारांच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे.

सुमेध वाघमारे नागपूर१ मे, जागतिक कामगार दिन, हा जगभरातील कामगारांच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. परंतु या दिवसाचा विसर कामगारांच्या आरोग्य सांभाळणाऱ्या सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला पडला आहे. या दिनाच्या निमित्ताने कामगारांच्या आरोग्यावर विशेष कार्यक्रम घेणे सोडा, इमारतीवर ध्वजही फडकविला जात नाही. नागपूर जिल्ह्यात सुमारे २ हजार लहान मोठे उद्योग आहेत. यात सुमारे ५० हजार कामगार आहेत. उद्योग व कारखान्यात शिसे, फॉस्फरस, सफ्लाईन, बेझिंन, मॅगनीज इत्यादी घातक रसायने व नायट्रटेच्या धुरामुळे कामगारांना छातीचे तसेच इतरही आजार होतात. त्यांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून १९७० मध्ये नागपुरात या कामगार रुग्णालयाची स्थापन करण्यात आली. या कामगारांकडून वार्षिक अंदाजपत्रकनुसार सुमारे ८ कोटी रुपयांच्यावर निधी रुग्णालयाला मिळतो. परंतु येथे आकस्मिकरीत्या भरती झालेल्या व मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर येथे उपचारच होत नाहीत. गुंतागुंतीच्या प्रसुतीच्या शस्त्रक्रिया ते मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मेडिकल किंवा खाजगी रुग्णालयांची रुग्णांना वाट धरावी लागते. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांपासून ते चतुर्थ श्रेणी पदांपर्यत ५५ टक्के पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील आकस्मिक विभाग असून नसल्यासारखा आहे. दुपारी २ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत आकस्मिक विभागाचा कारभार वॉर्डातील एक परिचारिका पाहते. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ९ ते १ पर्यंत आहे, मात्र सर्व वरिष्ठ डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी १० वाजल्याशिवाय ओपीडीत बसत नाही. १०.३० वाजता सुरू होणारी ओपीडी दोन तासात बंद होते. अशा अनेक अडचणीला हे रुग्णालय समोर जात आहे. कामगाराच्या आरोग्याप्रति गंभीर नसलेले प्रशासन रुग्णालयात कामगार दिन साजरा करण्यातही उदासीनता दाखवित आहे. तज्ज्ञाच्या मते या दिवशी कामगारांसाठी आरोग्य शिबिरे, त्यांच्या विविध आजारांच्या संदर्भातील जनजागृती करणे आवश्यक आहे. परंतु या सर्वांचा विसर पडला आहे. रुग्णालयाच्या इमारतीवर या दिनाच्या निमित्ताने झेंडा फडकविण्याचे औचित्यही रुग्णालय प्रशासन दाखवित नाही. एकप्रकारे कामगारांच्या आरोग्याप्रति उदासीनता दाखवून त्यांची पिळवणूक सुरू आहे. पूर्वी याच पिळवणुकीच्या विरोधात कामगार एकजूट झाले, उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले, हक्क मिळाले. कामगार दिन साजरा होऊ लागला. आता पुन्हा तोच उठाव आरोग्याचे हक्क मिळण्यासाठी करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.