शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांवर धाक ठेवून काम करा

By admin | Updated: August 27, 2016 02:05 IST

शहर पोलीस दलाची चमू अतिशय चांगली आहे. सर्वत्र या चमूचे नाव घेतले जाते. गुन्हेगारांवरही पोलिसांचा धाक आहे.

पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी पदभार सांभाळला नागपूर : शहर पोलीस दलाची चमू अतिशय चांगली आहे. सर्वत्र या चमूचे नाव घेतले जाते. गुन्हेगारांवरही पोलिसांचा धाक आहे. तो तसाच कायम ठेवून प्रामाणिकपणे आणि सांघिक भावनेने काम करा, असा हितोपदेश शहराचे नवीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी येथील पोलीस अधिकाऱ्यांना केला. डॉ. व्यंकटेशम यांनी आज सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालय गाठले. मावळते आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना आयुक्तपदाची सूत्रे सोपवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छोटेखानी बैठकीनंतर त्यांनी लगेच पोलीस जिमखाना गाठला. येथे पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी पहिल्याच बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे आणि सांघिक भावनेने तणावमुक्त काम करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, नागपूर शहर पोलिसांचे सर्वत्र नाव आहे. त्याला बट्टा लागू नये. अवैध धंदेवाले, गुन्हेगार यांच्यावर धाक ठेवूनच काम करा. गुन्हेगारी अवैध धंद्यांमुळेच फोफावते. त्यातून पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे आणि दीर्घकाळ कटू आठवणी ठेवणाऱ्या (कोपर्डीसारख्या) घटना घडतात. त्या घडू नये, यासाठी आम्ही सदैव तत्पर असले पाहिजे. स्वच्छ प्रतिमेचे धनी असलेले आणि कोणत्याही भागात अवैध धंदे आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले व्यंकटेशम स्वच्छ आणि पारदर्शक कार्यशैलीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून सर्वत्र ओळखले जातात. त्यांनी २६ / ११ चा हल्ला, मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळीच्या गुंडांचा केलेला सफाया, राज्यातील पोलीस प्रशिक्षण शाळांचे डिजिटलायझेशन, मुंबई विमानतळावरील सोन्याची तस्करी, बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळा आदी प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी म्हणून लक्षवेधी भूमिका वठवली आहे. मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपुरातही त्यांची कारकीर्द ते कशाप्रकारे लक्षवेधी करतील त्याकडे पोलीस दलासह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)मैत्रीपूर्ण संबंध जोपासामावळते पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी आज निरोप घेताना येथील अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. कुटुंबप्रमुखाला प्रसंगावधान राखत काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात. ते व्यक्तिगत नसतात. त्यामुळे आपण आपले काम अधिक निष्ठेने करावे, असे सांगतानाच सामान्य नागरिकांसोबतच प्रसारमाध्यमांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवा, असा सल्लाही यादव यांनी यावेळी दिला.