नागपूर : भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान बेंगळूर येथे पाच वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याची मालिका होणार आहे. विदर्भातील आंतरराष्ट्रीय पंच व माजी रणजीपटू उल्हास गंधे यांची मालिकेचे मुख्य पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघात होणारी पाच सामन्यांची मालिका २८ जून ते ८ जुलैदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. महालेखाकार कार्यालय (एजी) मध्ये कार्यरत उल्हास गंधे २८ जूनला होणाऱ्या पहिल्या आणि ३ जुलैला होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानावरील पंच (आॅनफिल्ड अंपायर) व १ जुलैला होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चौथे पंच आणि ६ जुलैला होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात तिसरे पंच म्हणून काम पाहणार आहेत. उल्हास गंधे यांनी यापूर्वी रणजी करंडकातील अनेक रणजी व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
महिलांच्या भारत-न्यूझीलंड मालिकेत उल्हास गंधे पंच
By admin | Updated: June 26, 2015 02:49 IST