शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी

By admin | Updated: August 14, 2016 02:56 IST

दारू प्यायलेल्या रुग्णावर उपचार करण्यास थोडी दिरंगाई केल्याने रुग्ण व त्याच्या तीन मित्रांनी कर्तव्यावर

हिंगणा येथील घटना : कक्षसेवकाला मारहाण हिंगणा : दारू प्यायलेल्या रुग्णावर उपचार करण्यास थोडी दिरंगाई केल्याने रुग्ण व त्याच्या तीन मित्रांनी कर्तव्यावर असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करून धमकी दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी कक्ष सेवकास मारहाण केली. ही घटना हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. आजवर अशा प्रकारच्या सात घटना घडल्याने महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्रपाळीत कर्तव्य बजावण्यास असमर्थतता दर्शविली आहे. हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालय शहराच्या धनगरपुरा भागात आहे. गुरुवारी रात्री वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्लेषा गाडबैल, परिचारिक रामटेके व कक्ष सेवक डवरे कर्तव्यावर होते. दरम्यान, रात्री ९.४५ वाजताच्या सुमारसा जयहरी लांजेवार (३५, रा. हिंगणा) हा त्याच्या तीन मित्रांसह ग्रामीण रुग्णालयात आला. त्याने अपघातात खरचटल्याचे सांगून उपचार करण्याची सूचना केली. तो दारू प्यायलेला होता. डॉ. गाडबैल या भोजन करीत असल्याने इतर कर्मचाऱ्यांना त्याला पाच मिनिटे थांबण्याची विनंती केली. त्यावर त्याने डवरे यांचा शर्ट पकडून मारहाण करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्याने डॉ. गाडबैल यांना अश्लील शिवीगाळ करून महिला असल्याने सोडून देत असल्याची बतावणी करीत पाहून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर काही वेळातच चौघेही मोटरसायकलने ग्रामीण रुग्णालयातून पळून गेले. या रुग्णालयात रात्रीपाळीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबतचे पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत घोडेराव यांना देण्यात आले. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३५३, ५०४,५०६, १८६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार हेमंत खराबे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)