शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या हातातून एक लाख पळविले

By admin | Updated: February 24, 2016 03:24 IST

पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील एक लाखाची रोकड असलेली पिशवी दोन लुटारूंनी हिसकावून नेली.

शांतीनगर रेल्वे क्रॉसिंगजवळील घटना : बँकेतूनही २८ हजार लंपास नागपूर : पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील एक लाखाची रोकड असलेली पिशवी दोन लुटारूंनी हिसकावून नेली. तर, बँकेत बसलेल्या महिलेच्या हातातून एका लुटारूने २८,५०० रुपये पळविले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी या घटना घडल्या.डिप्टी सिग्नल कळमना येथील सलेदबाई ईश्वर गिल्हूर (वय ४०) यांनी काही दिवसांपूर्वी ओळखीच्या व्यक्तीकडून एक लाख रुपये उधार घेतले होते. ते परत करण्यासाठी त्या सोमवारी दुपारी १ च्या सुमारास त्या व्यक्तीकडे जात होत्या. हनुमान मंदिरजवळ, शांतीनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ दोन आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी सलेदबाईच्या हातातील पिशवी हिसकावून पळ काढला. पिशवीत एक लाखाची रोकड होती. ती लुटली गेल्यामुळे सलेदबाई मदतीसाठी आरडाओरड करू लागल्या. आजूबाजूची मंडळी जमली. त्यांना सलेदबाईने घडलेली घटना सांगितली. मात्र, मदतीचा हात मिळेपर्यंत आरोपी नजरेआड झाले होते. दुसरी घटना बँक आॅफ महाराष्ट्रच्या वर्धमाननगर शाखेत दुपारी १२.१५ ला घडली. भांडेवाडी पारडी येथील संगीता संजय चव्हाण (वय ३०) यांनी बँकेतून ५० हजार रुपये काढले. पती येणार असल्यामुळे त्या बँकेतच वाट बघत बसल्या. तेवढ्यात तेथे एकजण आला. तुमच्या जवळच्या नोटा नकली आहेत, मलाही अशाच नकली नोटा बँकेतून मिळाल्या, असे सांगत आरोपींनी आपल्या जवळच्या चार नोटा संगीता यांच्यासमोर धरल्या. तेवढ्यात आणखी काही जण तसेच सांगू लागले. ‘तुमच्या नोटा तपासून घ्या’ असे म्हणत आरोपींनी संगीता यांच्याजवळचे ५० हजारांचे बंडल ताब्यात घेतले. तेवढ्यात दोघांनी संगीतांचे लक्ष विचलित केले आणि नोटा तपासण्याचा बनाव करणाऱ्या आरोपीने ५० हजारातील तब्बल २८,५०० रुपये स्वत:च्या खिशात घालून उर्वरित २१,५०० रुपये संगीता यांच्या हातात ठेवले. नोटा बरोबर आहे, असे म्हणत आरोपी निघून गेले. एका पाठोपाठ दोन महिला रक्कम लंपास केल्याची तक्रार घेऊन लकडगंज ठाण्यात आल्या. पोलिसांनी दोन्हीच्या तक्रारी नोंदवून घेतल्या. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी बँक तसेच रेल्वेक्रॉसिंग जवळच्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले आहे. (प्रतिनिधी)