शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री ही माता, ती प्रतिशोध घेत नाही तर प्रत्युत्तर देते :आशा पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 19:24 IST

स्त्रीच्या क्षमता अपार आहेत. ती निर्मिका आहे. ती माता आहे. त्यामुळे, तिला प्रतिशोध घ्यावेसे वाटत नाही. मात्र, कोणत्याही संकटांना, समस्यांना ती नेटाने प्रत्युत्तर देऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आशा पांडे यांनी केले.

ठळक मुद्देस्त्रियांनी स्त्रियांचे आत्मावलोकन करणे गरजेचेशब्दरंग महिला साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्त्रीच्या क्षमता अपार आहेत. ती निर्मिका आहे. ती माता आहे. त्यामुळे, तिला प्रतिशोध घ्यावेसे वाटत नाही. मात्र, कोणत्याही संकटांना, समस्यांना ती नेटाने प्रत्युत्तर देऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आशा पांडे यांनी केले. 

गुरुवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या श्रीमती विमलाताई देशमुख सभागृहात आम्ही लेखिका आणि धनवटे नॅशनल कॉलेजच्या वतीने एकदिवसीय शब्दरंग महिलासाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, संमेलनाध्यक्ष म्हणून पांडे बोलत होत्या. व्यासपीठावर उद्घाटक म्हणून ‘आम्ही लेखिका’चे संस्थापक अध्यक्ष मोहन कुळकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार, मराठी विभाग प्रमुख डॉ. भारती खापेकर, याप्रसंगी जाहीर करण्यात आलेल्या आम्ही लेखिका नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर, किरण पिंपळशेंडे, धनश्री पाटील, दीप्ती हांडे, नीता अल्लेवार, वर्षा बोध, मीरा भागवत, डॉ. अर्चना अलोणी व वर्षा देशपांडे उपस्थित होते.स्त्रियांचे भाव आणि कर्मविश्व शहरी आणि ग्रामीण भागात भिन्न आहेत. शहरातही उच्चभू्र, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी महिलांशी संवाद साधण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला आहे का? असा सवाल उपस्थित करत, स्त्रियांनी स्त्रियांचे आत्मावलोकन करणे गरजेचे असून, त्यातून व्यक्त होण्याची गरज असल्याचे आशा पांडे म्हणाल्या. निर्मिती हा स्त्रीचा स्वभावधर्म आहे. मग, तिच्याच निर्मिती प्रक्रियेत भोगाव्या लागत असलेल्या समस्या ती का लिहीत नाही, हा विचार लेखिकांना करायचा आहे. स्त्रीनेच स्त्रीला समजून घेणे गरजेचे असून, खऱ्या अर्थाने आता आत्मावलोकनाची गरज आहे. मुले ‘आई तुला काय कळतं’ असे बोलत असल्याचे ऐकायला येत आहे. तुम्हाला काय कळतं, याची जाणिव या जगाला करवून देण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हायचे आहे. या मोबाईल तांत्रिक पिढीला तुम्ही किती मजबूत आहात, याची जाणीव करवून द्यायची आहे. त्यासाठीच लिखाण करण्यास सज्ज व्हावे लागेल. तुम्ही लिहाल तरच ही पिढी ‘आज माझ्या आईला काय हवय’ याचा विचार करेल, असे आशा पांडे यावेळी म्हणाल्या. उद्घाटन सत्राचे संचालन मीरा भागवत, डॉ. अर्चना अलोनी, वर्षा देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक भारती खापेकर यांनी केले. आभार दीप्ती हांडे यांनी मानले.स्त्री आता चौकटीच्या बाहेर निघाली - मोहन कुळकर्णी‘आम्ही लेखिका’ संस्थेच्या संकल्पनेची माहिती देताना मोहन कुलकर्णी यांनी स्त्री चूल व मुलाच्या चौकटीतून बाहेर पडली असल्याचे स्पष्ट केले. आता तिच्या लिखाणाला व्यासपीठ आवश्यक असून, हाच संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेची स्थापना एक वर्षापूर्वी झाली असली तरी जगभरातील ५ हजार ७९२ लेखिका या व्यासपीठाशी जोडल्या गेल्याचे म्हणाले.साहित्यनिर्मितीसाठी समाजाने पुढाकार घ्यावा - सुरेंद्र जिचकारधर्म टिकविणाऱ्या व संरक्षण करणाऱ्यांच्या पाठीशी ज्याप्रमाणे समाज उभा असतो, त्याचप्रमाणे साहित्य निर्मिती करणाऱ्यांच्या पाठीशी समाजाने सढळ हाताने उभे राहण्याची गरज असल्याची भावना प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Womenमहिलाliteratureसाहित्य