शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला चिरडले, पती गंभीर

By admin | Updated: November 26, 2015 03:15 IST

मानेवाडा चौकात एका अनियंत्रित ट्रकने बाईकस्वार दाम्पत्यास जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे.

मानेवाडा चौकातील घटना : दगडफेकीमुळे तणाव नागपूर : मानेवाडा चौकात एका अनियंत्रित ट्रकने बाईकस्वार दाम्पत्यास जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. कुंदा परमेश्वर लेंडे (३२) दुर्गानगरी उमरेड, असे मृत महिलेचे नाव आहे. कुंदाचा पती परमेश्वर हा मजुरी करतो. एक महिन्यापूर्वी मृत कुंदाचे अपेंडिक्सचे आॅपरेशन झाले होते. बुधवारी डॉक्टरांनी तिला तपासणीसाठी बोलावले होते. दोघेही बाईकने हुडकेश्वरवरून ज्ञानेश्वरनगर येथील डॉक्टरकडे जात होते. मानेवाडा चौकातील वाहतूक सिग्नल बंद झाल्याने परमेश्वरने बाईक थांबवली. त्याच्या मागून आलेला ट्रक क्र. एम.पी./२२/एन/१०६५) हा ही थांबला. सिग्नल सुरू होताच महिलेच्या पतीने बाईक सुरू केली, परंतु ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने बाईकला धडक दिली. दोघेही ट्रकखाली आले. यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पती गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे परिसरात नागरिकांनी गर्दी केली. संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करून ट्रकचे काच फोडले. घटनेची माहिती होताच महिला पीएसआय कोंकणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनी नागरिकांना नियंत्रित केले. मानेवाडा चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात. त्यांच्यासमोरच अवैध वाहतूक सुरू असते. जड वाहनांची ये जा असते. परंतु पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या चौकात नेहमीच अपघात होत असतात, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. दोषी पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्धही कारवाई करण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)